जयंती उत्सव : विविध कार्यक्रमांचे आयोजन गोंदिया : येथील सिव्हील लाईन्समधील हनुमान चौकातील प्रसिद्ध हनुमान मंदिरासह शहरात ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरात शुक्रवारी (दि.२२) हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी एकच गर्दी केली होती. पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे ठिकठिकाणी महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. येथील सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान मंदिराची शहरात सर्वत्र ख्याती आहे. जयंती उत्सव या मंदिरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यामुळे पहाटेपासूनच भाविकांच्या येथे दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. या जयंती कार्यक्रमांतर्गत गुरूवारी (दि.२१) सकाळी सुंदरकांड व भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी १०००८ हनुमान चालीसा पाठाचा कार्यक्रम झाला. तसेच शुक्रवारी (दि.२२) पहाटे ५ वाजता अभिषेक, हवन, आरती करण्यात आली. त्यामुळे मंदिरात सकाळपासूनच हनुमंताच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून आली.गोंदिया शहरासोबतच जिल्ह्यात अनेक ठिकाणी हनुमान मंदिरांध्ये महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण दिसून आले. (शहर प्रतिनिधी)महाप्रसादासाठी उडाली झुंबडसिव्हिल लाईन्सस्थित हनुमान मंदिरातचे काही दिवसांपासून मागील बाजुने विस्तारीकरण करण्यात आले. येथे दयंतीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्यामुळे प्रसाद ग्रहण करण्यासाठी भाविक महिला-पुरूषांच्या लांबच लांब रांगाही दिसून आल्या. सायंकाळपर्यंत चाललेल्या महाप्रसादाचा हजारोंच्या संख्येत भाविकांनी लाभ घेतला. वेळ वाचविण्यासाठी अनेक ठिकाणी बुफेची व्यवस्था करण्यात आली होती.
हनुमंताच्या दर्शनासाठी अलोट गर्दी
By admin | Published: April 23, 2016 1:38 AM