शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
2
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
3
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
4
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
5
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
6
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
7
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
8
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
9
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
10
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
11
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
12
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
13
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
14
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
15
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
16
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
17
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
18
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
19
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
20
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप

‘हाजराफॉल’मध्ये वाढू लागली पर्यटकांची गर्दी

By admin | Published: August 17, 2015 1:36 AM

प्रसिद्ध हाजराफॉल धबधबा आजघडीला आपल्या सौंदर्याने नटला असून त्याचा आस्वाद घेण्यासाठी येथे पर्यटकांची एकच गर्दी दिसून येत आहे.

सहकुटुंब येणाऱ्यांची संख्या वाढली : समितीची नियंत्रणात्मक देखरेख, मुलांसाठी एडव्हेंचर स्पोर्ट्सविजय मानकर सालेकसामुख्यालयापासून १० किमी. अंतरावर पूर्वेकडे तर जिल्हा मुख्यालयापासून ५२ किमी. अंतरावर असलेला प्रसिद्ध हाजराफॉल धबधबा आजघडीला आपल्या सौंदर्याने नटला असून त्याचा आस्वाद घेण्यासाठी येथे पर्यटकांची एकच गर्दी दिसून येत आहे. दररोजच येथे सहलीची झुंबड दिसून येते.दरेकसा परिसरातून वाहत असणारे सर्व नदी-नाले एकत्र येऊन त्यांचे पाणी उंच पहाडावरून खाली पडते. धबधब्याचे हे दृश्य मन प्रफुल्लीत करणारे असते. त्यामुळे या ठिकाणी एखाद्या चुंबकीय शक्तीप्रमाणे दूरवरून पर्यटक खेचून येतात. पावसाळा सुरू होताच धनेगाव, कोपालगड व दलदलकुही या तिन्ही नाल्यांचे त्रिवेणी संगम होऊन हाजराफॉलवरील पहाडावर एकाच ठिकाणी पाणी एकत्रित होते व ते पाणी ओव्हर-फ्लो होवून खाली पडते. सुरूवातीला पडणारे पाणी गढूळ व लाल-पिवळ्या रंगाचे असते. परंतु जसजसा गढूळपणा दूर होतो, तसतशी पाण्यात शुभ्रता वाढते आणि हाजराफॉलचे सौंदर्य खुलत जाते.पूर्वी भागातील सतपुडा पर्वत रांगेच्या कुशीत असलेला हा धबधबा आॅगस्ट महिना व त्यानंतर बघण्यासाठी गेल्यास, मोठ्या हिरव्या-काळ्या गलिच्यावरून कुणी सतत दूध सोडतो की काय? असे वाटते. या धबधब्याचे पाणी खाली पडून एका तलावात जमा होऊन नंतर ते कुआढास नाल्याच्या माध्यमातून वाघनदीला जाऊन मिळते. हाजराफॉलला कसे पोहोचवावे?सालेकसा तालुक्यात राज्य महामार्ग क्रं. २४९ दरेकसाजवळ पर्वत रांगेच्या कुशीत असलेला हाजरॉफाल दर्रेकसा रेल्वे स्टेशनपासून पश्चिमेकडे एक किमी. अंतरावर आहे. स्टेशनवरून पायी चालत असताना रेल्वे लाईनवरून गेल्यास या पर्वतातील बोगद्यातून रेल्वेगाडी जाते. त्याची वेगळी अनुभूती प्रत्यक्ष पाहणाऱ्यांना मिळते. तसेच दुसऱ्या बाजूला खुला बोगदासुध्दा आकर्षित करीत असतो. बोगदा पार केल्यावर हाजराफॉल परिसरात पोहचता येते. गोंदियावरून लोकल ट्रेन किंवा बस मार्गाने पोहचता येते. स्वत:च्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने या स्थळापर्यंत सरळ पोहोचता येते.