पट्ट्यामधून सूर्यप्रकाश आत गेेल्याने पाणी गरम राहतो व भाताच्या बुंध्याजवळील बुरशींचा नायनाट होतो. तसेच पीक वाढल्यानंतर शुद्ध हवा आत शिरायला पट्ट्याची मदत होते. सोबतच खते व औषधी फवारणीला शेतात व्यावस्थित मार्ग असतो. ही पट्टा पद्धत वापरल्याने भात पिकाचे दाने चांगले भरतात व रोगाचा प्रसार कमी असल्याने उत्पादनात वाढ होते. याच तंत्रज्ञानाची माहिती शुक्रवारी (दि.९) धर्मराज दामाजी राणे यांच्या शेतात कृषी सहायक आर. एस. भानारकर यांनी प्रत्यक्ष करून दाखविले. इतर शेतकऱ्यांना पण त्यांच्या शेतात दर दहा फुटावर पृूर्व-पश्चिम दिशेत सव्वा फुटाचा एक पट्टा काढण्याबाबत मार्गदर्शन केले. उमेद समन्वयक जी.आर. पंडेले यांनी पद्धतीची माहिती दिली. यावेळी उपसरपंच मोहन वरठी, शेतकरी खेमराज कटरे, युवराज कटरे, सुनील टेेंभरे, शिवचरण गजभीये. कृषी सखी तुलसी ठाकरेे व शेतकरी हजर हाेते.
पट्टा पद्धतीने भात पिकाची लागवड ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:20 AM