शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

सभापतींच्या निवडीची उत्सुकता

By admin | Published: February 17, 2017 1:42 AM

नगर परिषदेच्या विषय समित्यांचे गठन करून सभापतींची निवड शुक्रवारी (दि.१७) केली जाणार आहे.

आज विशेष सभा : नावे गुलदस्त्यात, विरोधकांच्या खेळीकडे सत्ताधाऱ्यांचे लक्षगोंदिया : नगर परिषदेच्या विषय समित्यांचे गठन करून सभापतींची निवड शुक्रवारी (दि.१७) केली जाणार आहे. त्यासाठी विशेष सभेचे आयोजन केले आहे. याच सभेत उपाध्यक्षांना कोणती समिती द्यावयाची याचाही निर्णय घेतला जाणार आहे. सभापतीपदांवर कोणाकोणाची वर्णी लावायची याबाबत सत्ताधारी भाजपकडून गुप्तता पाळली जात आहे. दरम्यान सभापतीपद पटकावण्यासाठी विरोधक काही खेळी खेळणार का, याबाबतही उत्सुकता लागली आहे.नगर परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ सुरू झाला असून उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली आहे. फक्त विषय समित्या व सभापतींची निवड बाकी होती. त्यासाठी शुक्रवारी (दि.१७) सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत नगर परिषदेतील बांधकाम समिती, पाणी पुरवठा समिती, महिला व बाल कल्याण समिती, स्वच्छता व आरोग्य समिती, नियोजन समिती व शिक्षण समितींचे गठन करून सभापतींची निवड केली जाईल. सभापतीपदांसाठी इच्छुकांकडून सुरूवातीपासूनच वरिष्ठांची मनधरणी सुरू होती. आता पक्षांकडून कुणाचे नाव पुढे केले जाते व कुणाची सभापतीपदी वर्णी लागते हे शुक्रवारीच दिसून येणार आहे. मात्र पक्षांकडून त्यांच्याकडील उमेदवारांच्या नावांना घेऊन चांगलीच गुप्तता बाळगली जात असल्याचे दिसून आले.या सभेत उपाध्यक्षांना कोणती समिती देण्यात यावी यावरही निर्णय घेतला जाणार आहे. आतापर्यंत उपाध्यक्षांना स्वच्छता व आरोग्य समिती दिली जात होती. यंदा मात्र त्यात काही तरी बदल होणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे यासाठी सभागृहात मताधिक्याच्या आधारावर हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. शिवाय सभापतीपदांसाठी आता नवनवे समिकरण तयार केले जाणार असल्याने सभागृहात नेमके काय होते याबाबत औत्सुक्याचे वातावरण आहे. शुक्रवारी (दि.१७) सकाळी ११ वाजतापासून सभापतीपदासाठी अर्ज घेतले जाणार असून दुपारी २ वाजतापासून सभा सुरू होणार असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)