रावणवाडी : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आले असून उष्ण वातावरणाचा फायदा घेत मिनरल वॉटरच्या नावाखाली कुठलेही पाणी बॉटल तसेच पाऊचमध्ये पॅकींग करून मिनरल वॉटरच्या नावाखाली विकून पैसे लुबाडत आहेत. हा सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा गोरखधंदा सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बस थांबा हॉटेल्स, पानटपरी इतरत्र पाऊच विक्रेत्याकडून सर्रास बोरवेल्सचा पाणी भरून मिनरल वॉटर म्हणून विक्री केली जात आहे. मात्र या पाण्याची गुणवत्ता कुणीच तपासून पाहात नाही. तालुक्यात मिनरल वॉटरच्या धंद्याला उधान येत आहे. उपलब्ध असलेल्या बोरवेल्सचा पाणी पाऊच बंद करून प्रती पाऊन ३ ते ५ रुपये दराने विकले जाते. या पाऊचमध्ये बंद असलेल्या पाण्यात सूक्ष्मजीव-जंतूची वाढ प्रखरतेने वाढत जाते. त्यामुळे नागरिकाना या पाण्यामुळे अनेक लोकांना असाध्य रोगाना बळी पडावे लागत आहे. मिनरल वॉटर तयार करण्यासाठी क्लोरीन आसैनिक प्लारीन आर्यन पोटॉशियम मॅग्नेशियम या केमिकल्सच्या सह्याने पाण्याची शुध्दता केली जाते. त्यानंतर सुक्ष्मजीव, जंतू त्यात येऊ नये. यासाठी योग्य प्रकारे खबरदारी घेत त्याची पॅकींग केली जाते. परंतु बाजारात विक्रीस आलेल्या पाणी पाऊच हे कुठल्याही शासनमान्य कंपन्याचे नूसन हे अवैधरित्या बाजारातील बसस्टॉपवर पान टपरी हॉटेल्स रेल्वे स्टेशनवर विकले जाते. मात्र यावर अन्न व औषध प्रशासन विभाग कुठलीही कारवाई करत नाही. मिनरल वॉटर तयार करणाऱ्या कंपन्यावर याच प्रशासनाचे आशिर्वाद असल्याचे स्पष्ट होत आहे.
मिनरल वॉटरच्या नावावर ग्राहकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2016 1:51 AM