लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आल्यानंतरही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याची सक्ती न करता तो ऐच्छिक करण्यात यावा. या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी. अन्यथा शुक्रवारपासून (दि.१३) आंदोलन छेडण्याचा इशारा सडक-अर्जुनी तालुक्यातील सेवा सहकारी संस्थाच्या अध्यक्षांनी दिला आहे.जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. बऱ्याच गावांची पैसेवारी देखील कमी आहे. शासनाने तीन तालुके मध्यम स्वरुपाचे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. सडक अर्जुनी तालुक्याची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असून पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत तालुक्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. पीक कर्जाची उचल करताना शेतकऱ्यांना पीक विमा काढणे अनिवार्य केले आहे. कृषी विभागाकडून सुध्दा शेतकºयांना पीक विमा काढण्यासाठी प्रवृत्त केले जाते. पीक विमा कंपन्या हंगामादरम्यान शेतकऱ्यांना पीक विम्या काढण्याची सक्ती करतात. तर बँकाकडून जबरदस्तीने पीक विम्याची रक्कम कर्जातून कपात केली जाते. मात्र यंदा जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांला नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. शासनाने पीक विम्याची सक्ती न करता ते ऐच्छिक करावे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याची गरज वाटेल ते काढतील. मात्र इतर शेतकऱ्यांना त्याची सक्ती करु नये, अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी दिला आहे.कर्जमाफीची रक्कम केव्हा देणारराज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत मागील वर्षी कर्जमाफीची घोषणा केली. त्यानुसार सडक-अर्जुनी तालुक्यातील नियमित व थकबाकीदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे कजर् वसुली करताना सेवा सहकारी संस्थाच्या अध्यक्षांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरीत पैसे जमा करण्यात यावे, अशी मागणी अध्यक्षांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.आंदोलनाचा इशाराधान उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा ऐच्छिक करण्याचा निर्णय त्वरीत न घेतल्यास सेवा सहकारी संस्था व शेतकऱ्यांच्या नेतृत्वात सरकार व विम्या कंपन्याच्या विरोधात मोठे आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, मीताराम देशमुख, जागेश्वर धनभाते, मनोहर काशिवार, ईश्वर कोरे, आकोजी रहेले, तेजराम मुंगलमारे, परसराम सुकारे, के. बी. परशुरामकर, डी.के.राऊत, एन.टी.पारधी, जे.एस.कुरसुंगे, एम.वाय.गायकवाड, डी.एन.गावतुरे, डी.डी.गौतम, धनलाल करचाल, शिवाजी गहाणे, अनिल गुप्ता यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना पीक विमा ऐच्छिक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 10:16 PM
नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आल्यानंतरही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली.
ठळक मुद्देसेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष आक्रमक : कर्जमाफीची रक्कम केव्हा जमा होणार