डासांचा प्रादुर्भाव वाढला
गोंदिया : शहरातील नाल्या उपसण्यात न आल्याने कचऱ्याने तुंबल्या आहेत. परिणामी, डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासंबंधी नगर परिषदेकडे निवेदने देण्यात आली.
अल्पखर्चाचे शुभमंगल प्रेरणादायी
अर्जुनी-मोरगाव : कोरोनामुळे विवाह समारंभावरही बंधने आली आहेत. थेट आठ महिन्यांपासून बंद असलेली सामाजिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेली विवाह परंपरा सुरू झाली आहे.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला
गोरेगाव : शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लास्टिकचा कचरा दिसत असून, शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे.
रेती साठ्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील रेती घाट परिसरात व शहरातील चंद्रभागा नाका, चुरडी, शाल्व्हीन बार मागे, अन्य ठिकाणी शहरात रेतीचा मोठा साठा पडला असतो.
विडी उद्योगास उतरती कळा
गोंदिया : जिल्ह्यात एकेकाळी मोठ्या उद्योगांना आव्हान देणाऱ्या विडी उद्योगास उतरती कळा लागली आहे. हे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कामगारांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.
मोबाइल नेटवर्क ठरतेय ऑनलाइन शिक्षणात ब्रेकर
बिरसी-फाटा : तालुक्यातील वडेगाव, मुंडीकोटा, परतवाडा, अर्जुनी या परिसरात मोबाइल नेटवर्कची समस्या निर्माण झाल्याने ऑनलाइन शिक्षणात ब्रेकर निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
परिसरात विविध कंपन्यांचे मोबाइल टॉवर आहेत; परंतु मागील काही महिन्यांपासून या परिसरात नेटवर्कची समस्या निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे मागील दीड वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे; परंतु मोबाइलचे नेटवर्क राहत नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेस करण्यापासून वंचित राहावे लागत आहे. नेटवर्कच्या समस्येमुळे ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांसह पालकही मुलांच्या शिक्षणाबद्दल चिंतित आहेत. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आनंद पटेल यांनी सर्व मोबाइल याकडे लक्ष देऊन नेटवर्कमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे.