शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

कटंगटोला कालव्याचा दगड बनला अडसर

By admin | Published: January 26, 2017 1:35 AM

ओवारा लघु प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या वळदवरुन जाणाऱ्या कटंगटोला कालव्यातील दगड हा

ओवारा लघु प्रकल्प : अधिकाऱ्यांच्या कारभाराचा शेतकऱ्यांना फटका आमगाव : ओवारा लघु प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या वळदवरुन जाणाऱ्या कटंगटोला कालव्यातील दगड हा शेतकऱ्यांचा कर्दनकाळ ठरला आहे. या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या तुघलकी कारभारामुळे एक महिन्यापासून कर्दनकाळ ठरलेला दगड फुटत नसल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती मोठी दयनीय झाली आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये व्यापक असंतोष निर्माण झाला आहे. ओवारा लघु प्रकल्पांतर्गत वळद येथे ७० हेक्टर व कटंगटोला येथे ६० हेक्टर शेतीला उन्हाळी धानाकरिता पाणी देण्याचे ठरले होते. वळद येथील मुख्य मार्गावर खोदकाम करुन कालव्यातील दगड काढणे गरजेचे असल्यामुळे हा दगड फोडण्यास खूप त्रास होत आहे. जोपर्यंत कालव्यातील दगड तोडल्या जात नाही तोपर्यंत कटंगटोला येथील साठ एकर शेतीला सिंचन होणार नाही. २७ डिसेंबर २०१६ ला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाणी देण्याचे लेखी आश्वासन शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील लाखोळी, जवस नष्ट केले. त्या पिकांचे हातात काही मिळाले नाही व उन्हाळी धानाचे पऱ्हे शेतात लावले. एक महिना लोटूनसुद्धा शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. आता त्वरित पाणी देण्याची मागणी होत असून दगड कसा फोडला जाईल, हाच गंभीर प्रश्न आहे. जर दगड फोडण्याकरिता बारुद, सुरुंग लावला तर शेजारील घरांना झटके लागतील. यामुळे नुकसान घरांची होईल. या भितीने सध्या ओवारा लघू प्रकल्पातील अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. विशेष म्हणजे साखरीटोला, तिगाव मार्गावर वळद गाव असून मुख्य मार्गाला तोडण्यात आले आहे. हा मार्ग मोठ्या प्रमाणात रहदारीने सुरू असतो. रस्त्याची एक बाजू तयार असून तेथून रहदारी सुरू आहे. मात्र दुसऱ्या बाजूला मोठी खिंड असल्यामुळे रात्री किंवा दिवसा मोठी दुर्घटना टाळता येऊ शकत नाही. त्यामुळे त्वरित रस्त्याला पाईप टाकून व दगड फोडून शेतकऱ्यांना पाणी देण्याची मागणी जि.प.सदस्य जीयालाल पंधरे, वळद सरपंच किशोर रहांगडाले, गेंदलाल यावलकर, धनेश्वरी चौधरी, दिलीप काटेखाये, उपसरपंच ललीता बिसेन, प्रविण रहांगडाले, हरिणखेडे, पारबता गजबे, ललीता रहांगडाले, हंसगिता रहांगडाले यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)