नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कर्करोगाला आमंत्रण देणाऱ्या तंबाखूला पायबंद घालण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दाभना हे गाव पुढे आले आहे. गावातील जनता निरोगी राहावी व संस्कारक्षम विद्यार्थी घडावेत यासाठी दाभना गावाने तंबाखू विक्री बंदी गावाचा ठराव घेतला आहे. गावात तंबाखू विक्री होणार नाही असा संकल्प करण्यात आला आहे.तंबाखू नियंत्रण पथक जिल्हा व तालुका पथकाकडून करण्यात येणाºया कारवाईमुळे प्रभावित होऊन अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दाभना ग्रामपंचायतीने तंबाखूमुक्त गाव करण्याचा ठराव घेतला आहे. गावातील विद्यार्थी व तयार होणारी पिढी संस्कारक्षम व्हावी या उद्देशातून गाव तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला.जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अमरीश मोहबे, अर्जुनी-मोरगावचे पोलीस निरीक्षक कुंभरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व तालुका तंबाखू नियंत्रण पथकाने अर्जुनी-मोरगाव तालुक्यात तंबाखू विक्री करणाºया १५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.५ फेब्रुवारीला करण्यात आलेल्या कारवाई करणाऱ्या पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर बुराडे, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाण, झामेश गायकवाड, विलास कारेवार, जिल्हा सल्लागार डॉ.शैलेश कुुकडे, सुरेखा आझाद, एन.मेश्राम व संध्या शंभरकर यांचा समावेश होता.विक्रेत्यांवर असा आहे दंडसार्वजनिक क्षेत्रात धुम्रपान करण्यास बंदी आहे. धुम्रपान करताना आढळल्यास २०० रूपये दंड, कलम ५ नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहीरात करण्यावर बंदी आहे. ते करताना आढळल्यास २ वर्षापर्यंत शिक्षा किंवा एक हजार रूपये दंड, दुसºयांदा गुन्हा केल्यास ५ वर्षापर्यंत शिक्षा किंवा पाच हजार रूपये दंड आहे.विक्रेत्यांचे फलकच गायब१८ वर्षाखालील बालकांना तंबाखू विक्री करणे कायद्याने दंडनिय अपराध आहे. तंबाखू विक्रेत्यांनी १८ वर्षाखालील व्यक्तीस तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हा दंडनिय अपराध आहे. असे फलक विक्रेत्यांनी दुकानासमोर लावणे बंधकारक आहे. तो फलक न लावणाऱ्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांना २०० रूपये दंड आहे. गोंदिया जिल्ह्यात हे फलक दिसतच नाहीत. कलम ६ (ब) नुसार शैक्षणीक संस्थाच्या तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे. आढळल्यास २०० रूपये दंड करता येते.खुली तंबाखू व खर्रा विक्रीमुळे उल्लंघनकलम ७ नुसार तंबाखूच्या वेस्टनावर धोक्याची सूचना देणे बंधनकारक आहे. खुल्या तंबाखू व खर्रा यावर कोणत्याच प्रकारची सूचना नसते.त्यामुळे कलम ७ चे उल्लंघन होते. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खर्रा विक्री केला जात आहे. तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ उत्पादकाचा पहिला गुन्हा असेल तर त्याला २ वर्षापर्यंत शिक्षा किंवा ५ हजार रूपये दंड, विक्रेत्याचा पहिला गुन्हा असेल तर १ वर्षापर्यंत शिक्षा किंवा ५ हजार रूपये दंड अशी माहिती विक्रेत्यांना देण्यात आली.
तंबाखू विक्रीवर बंदी असलेले पहिले गाव होणार दाभना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:44 AM
कर्करोगाला आमंत्रण देणाऱ्या तंबाखूला पायबंद घालण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दाभना हे गाव पुढे आले आहे. गावातील जनता निरोगी राहावी व संस्कारक्षम विद्यार्थी घडावेत यासाठी दाभना गावाने तंबाखू विक्री बंदी गावाचा ठराव घेतला आहे.
ठळक मुद्दे१५ तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई : गावकऱ्यांनी घेतला तंबाखूमुक्त गावाचा ठराव