अर्जुनी मोरगाव : देश-विदेशात मानवधर्म, तत्त्वज्ञान, अहिंसा, जागतिक शांतता, करुणा, मानवी हक्कासाठी आजीवन संघर्ष करून शांततेच्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी, तिबेटीयनांचे आध्यात्मिक धर्मगुरू दलाई लामा यांचा नार्जेलिंग तिबेटीयन निर्वासित वसाहतीत वाढदिवस साजरा करण्यात आला. रिजनल तिबेटीयन महिला असोसिएशनने या सोहळ्याचे आयोजन केले होते.
दलाई लामा यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतापगड येथे अंध, अपंग, गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याची मदत करण्यात आली. प्रतापगड येथील एका अंध, निराधार महिलेच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. ‘लामा’ याचा अर्थ ‘ज्ञानाचा महासागर’ असा आहे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा हा लामांचा विचार घेऊन रिजनल तिबेटीयन महिला असोसिएशन कार्य करीत राहील, असे अध्यक्षा कुनसंग देचेन यांनी मत व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्ष ताशी डोलमा, केलसंग वांगमो, कुंगा डिकी उपस्थित होते.
080721\img-20210708-wa0009.jpg
तिबेटीयन वुमन्स असोसिएशनच्या वतीने तिबेटीयन वसाहतीत दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करताना