शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

वर्दळ असलेल्या बाजारपेठेत धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:15 PM

येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या अंबिका वस्त्रालय अ‍ॅन्ड गारमेंटस्मध्ये शुक्रवारी रात्री ते शनिवारी (दि.१८) पहाटेच्या दरम्यान अज्ञात आरोपींनी सुमारे साडे पाच लाख रुपयांचे कापड व रोकड लांबविल्याची घटना घडली. भरवस्तीत व वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या धाडसी चोरीमुळे व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनागरिकात दहशत : अज्ञात आरोपींनी लांबविले साडे पाच लाखांचे कापड व रोकड

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या अंबिका वस्त्रालय अ‍ॅन्ड गारमेंटस्मध्ये शुक्रवारी रात्री ते शनिवारी (दि.१८) पहाटेच्या दरम्यान अज्ञात आरोपींनी सुमारे साडे पाच लाख रुपयांचे कापड व रोकड लांबविल्याची घटना घडली. भरवस्तीत व वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या धाडसी चोरीमुळे व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली आहे.अर्जुनी मोरगाव येथील बाजारपेठेत अंबिका वस्त्रालय अ‍ॅन्ड गारमेंटस् नामक प्रतिष्ठान आहे. खालच्या तळठिकाणी कापडाचे दुकान व वरच्या मजल्यावर कुटुंबीय राहतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री कापड दुकान बंद झाले. दुकानात मान्सून हंगाम निमित्त सेल सुरु आहे. इतर वेळेपेक्षा मान्सून हंगामात कापड स्वस्त दराने मिळतात. म्हणून शुक्रवारी दुकानात बरीच गर्दी होती. दुकान बंद केल्यानंतर कुटुंबीय भोजन करुन झोपी गेले. वर्दळीच्या रस्त्यावर रात्री सामसूम असल्याची खात्री करुन अज्ञात चोरट्यांनी डाव साधला. दुकानातील शटरच्या मध्यभागी असलेला कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानाच्या गल्ल्यात अंदाजे ८२ हजार रुपयांची रोकड होती. ती चोरट्यांनी लंपास केली. एवढ्यावरच त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी दुकानातील महागड्या कपड्यांचा शोध घेतला. १ लाख ७० हजार रुपयाचे अंदाजे १०० नग जिन्स पँट, १ लाख रुपयाचे अंदाजे ८० नग टाऊजर, १ लाख २० हजार रुपये किमतीच्या अंदाजे ७० नग साड्या व ७० हजार रुपये किमतीचे अंदाजे १०० नग शर्ट व टी शर्ट लांबविले. असे एकूण ५ लाख ४२ हजार रुपये किमतीचे कापड व रोकड चोरीला गेले. पहाटे फिरायला जाणाऱ्या लोकांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी भ्रमणध्वनीवरुन याची माहिती कुटुंबियांना दिली. त्यांनी दुकानाच्या शटरकडे बघताच चोरी झाल्याची खात्री पटली. याची सूचना अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याला देण्यात आली.पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे यांनी घटनास्थळाला भेट देवून तपास सुरू केला. नगराच्या सर्व मार्गावर शोधमोहीम राबविली. गोंदियाच्या श्वान पथक व ठसे, मुद्रा तज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानालाही दिशा गवसली नाही. ज्या ज्या ठिकाणी चोरट्यांनी स्पर्श केला असावा, अशा शंकेच्या ठिकाणच्या ठशांचे नमूने घेण्यात आले.देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळाला भेट दिली. दिपेश प्रतापभाई जीवाणी (३८) यांच्या फिर्यादीवरुन अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात कलम ४५७, ३८० भादंविचा अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. वर्दळीच्या ठिकाणी झालेला हा चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आवाहन अर्जुनी मोरगाव पोलिसांपुढे आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे हे करीत आहेत.