सडक/अर्जुनी : वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जांभळी व शेंडा वनक्षेत्रातील सागवान झाडांची सर्रासपणे कटाई होत आहे. येथील सागवान कटाई करून चिरानची तस्करी होत असल्याची माहिती आहे. गावठी आऱ्याच्या माध्यमातून कत्तल केलेल्या सागवन झाडाला चिरून त्या पाट्या फर्निचरचे काम करणाऱ्या लोकांना विक्री होत अल्याची माहिती आहे. ही प्रकार रात्रीच्या वेळी होत असल्याची माहिती आहे. परंतु वनविभागाचे कर्मचारी रात्रीच्यावेळी गस्त घालत नसल्यामुळे सागवन तस्करांचे चांगलेच फावले आहे. या परिसरात दररोज सागवनाची होणारी कत्तल लक्षात घेऊन वनविभाग अधूनमधून थातूरमातूर कारवाई करतो. या प्रकारात काही दिवसांपूर्वी तीन छोटे मासे अडकले. मात्र मोठे मासे अजूनही फरार असल्याची विश्वसनिय माहिती आहे. सागवन क्रमांक एकचे झाड असल्यामुळे याकडे शासनाची व तस्करांचीही नजर राहते. या वनातील लाकडे चोरणाऱ्या तस्करांशी वनविभागाच्या काही कर्मचारी, अधिकारी यांचे सोटेलोटे असवोत असे बोलल्या जात आहे. वनविभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष घालून सागवन वृक्षांची होणारी कत्तल थांबविण्याची मागणी होत आहे. तस्करांनी लाखो रूपयांचा माल चोरून नेला आहे. या परिसरात घनदाट जंगल असल्याने त्याचा फायदा घेत वनमाफीयांकडून रात्रीच्या वेळी या सागवनाची तस्करी करण्यात येते. ते माफीये लाकडे वाहनातून वाहून नेत असल्याची माहिती मिळाल्यावरही वनकर्मचारी कारवाई करीत नाही. त्या माफीयांना संरक्षण देण्याचे काम वन कर्मचारी करीत आहेत. जंगलातील सागवनाची झाडे मोठ्या प्रमाणात जात असल्यामुळे ते प्रकरण आपल्या अंगावर येऊ नये म्हणून थातूर-मातूर तर कारवाई केली नाही ना अशी शंका येत आहे. सागवानाच्या चिरानची मागणी अधिक असून त्याला भावची चांगला मिळतो. (शहर प्रतिनिधी)
रात्रीच्या अंधारात होते जंगलाची कटाई
By admin | Published: January 15, 2015 10:54 PM