शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दरोड्यात महिलेची हत्या

By admin | Published: July 10, 2015 1:42 AM

येथील वर्दळीच्या कापगते वसाहतीमध्ये गणेश ट्रेडर्सचे मालक सुरेश पशिने यांच्या घरी भरदिवसा दरोडा टाकून त्यांच्या पत्नीची हत्या करण्याची घटना गुरुवारी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० सुमारास घडली.

भरदिवसा घडलेला थरार : दागिने व रोकड लांबविल्याचा संशयअर्जुनी-मोरगाव : येथील वर्दळीच्या कापगते वसाहतीमध्ये गणेश ट्रेडर्सचे मालक सुरेश पशिने यांच्या घरी भरदिवसा दरोडा टाकून त्यांच्या पत्नीची हत्या करण्याची घटना गुरुवारी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० सुमारास घडली. या पद्धतीची अर्जुनी येथील ही पहिलीच घटना असल्याने परिसरात व विशेषत: गृहिणींमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. नितू सुरेश पशिने (४२) असे मृतक महिलेचे नाव आहे. गुरुवारी (दि.९) सकाळी नेहमीप्रमाणे सुरेश पशिने आपल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानवर गेल्यानंतर त्यांच्या पत्नी नितू घरी एकट्याच होत्या. त्यांच्या दोन मुली व एक मुलगा हे नागपूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतात. सुरेश पशिने यांचा जेवणाचा डब्बा घेण्यासाठी दुपारी नोकर हुपेंद्र शहारे हा पशिने यांच्या घरी आला तेव्हा त्याला दरवाजाला बाहेरून कडी लावलेली दिसली. त्यामुळे घरात कोणी नाही असे समजून तो माघारी परतला. बिसीसाठी आलेल्या महिलांनाही बाहेरून कडी दिसल्याने त्या पण पहिल्यांदा परत गेल्या. त्यानंतर दुसऱ्यांदा दार ठोठावले मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळानंतर आतमध्ये बसू असे एकमत करुन महिलांनी दार उघडले तेव्हा स्वयंपाकगृहात नितू मृतावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. हा प्रकार पाहून हादरलेल्या महिलांनी बाहेर निघून ही घटना इतरांना सांगितली. लगेच त्या ठिकाणी जमाव गोळा झाला. पोलिसांना पाचारण करण्यात आले. मृतदेहाशेजारी फरशीवर रक्तच रक्त पसरलेले होते. त्यासाठी सकाळी अज्ञात इसमांनी घरात प्रवेश केला. घरातील बेडरुममध्ये वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. भिंतीत तयार केलेल्या कपाटाची दारे उघडी होती. अज्ञात इसमांनी घरात प्रवेश करुन चोरी केली. मृतकाशी धक्काबुक्की करुन कोणत्यातरी लोखंडी वस्तूने डोक्यावर प्रहार केले आणि गंभीर दुखापत करुन आरोपी पळून गेल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळाला अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजमाने यांनी भेट दिली. लोकेश नंदकिशोर पशिने यांचे फिर्यादीवरुन पोलिसांनी भादंवि ३०२, ३९२ कलमान्वये गुन्हा नोंदविला. सहा पोलिस निरीक्षक अभिषेक राऊत, राजेश गज्जल, उपनिरीक्षक रत्नदीप साळुंखे व सहकारी पुढील तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)आज व्यापाऱ्यांचा बंदव्यापाऱ्याच्या घरी चोरट्यांनी भरदिवसा दरोडा टाकून हत्या करण्याची घटना पहिल्यांदाच अर्जुनीत घडली आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून शुक्रवारी (दि.१०) अर्जुनी मोरगावात बंद पाळण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.श्वानपथकाने दाखविला टी-पॉईंटपर्यंतचा रस्तागोंदिया येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने फिरत फिरत चिल्लर देशी दारूचे दुकान व साकोली व लाखांदूर रस्त्याच्या टी पॉर्इंटपर्यंत दिशा दाखविली आणि तिथेच ते थांबले.किती रोकड व दागिने गेले हे अस्पष्टमृतकाचे पती सुरेश यांना घटनेचा जबर धक्का बसला. त्यामुळे नेमके किती पैसे व दागिने चोरीला गेले ते सांगण्याच्या मन:स्थितीत ते नाही. थोडेफार सावरल्यानंतर नेमकी किती रोकड व दागिने चोरीला गेले हे स्पष्ट होईल.