लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आई-वडिलांच्या जीवनात मुलींची महत्ता सादर करणाऱ्या या नागदा येथील हास्य व्यंग कवी कमलेश दवे यांच्या कवितेने श्रोत्यांची वाहवाही लुटत कवी संमेलनात एकच समा बांधला. हा मंच होता महाराष्ट्र दिनानिमित्त येथील भारतीय नवयुवक छात्रोत्थान संस्थेच्यावतीने आयोजीत अखिल भारतीय कवी संमेलनाचा.या संमेलनाचे उद्घाटन खासदार प्रफुल्ल पटेल यांचे प्रतिनिधी म्हणून माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी माजी आमदार हरिहरभाई पटेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती हुकुमचंद अग्रवाल व ज्येष्ठ साहित्यीक व लेखिका त्रिवेणी तुरकर उपस्थित होत्या. पाहुण्यांच्या हस्ते माता सरस्वतीच्या छायाचित्राचे पूजन व माल्यार्पण करून या संमेलनाची सुरूवात करण्यात आली.याप्रसंगी सुरत (गुजरात) येथील कवयित्री पुनम गुजरानी यांनी शारदा वंदना सादर केली. त्यानंतर, झांसीचे गितकार अभिराज पंकज यांनी, ‘ पलको के परछाई की कसम, तेरे आखो, की गहराई की कसम’ हे गीत सादर केले. तर ऐटा निवासी वीर रस कवी डॉ. राकेश मधुकर यांनी, ‘रोशनी का अंधेरे से अनुबंध है, बिजलीयो और आंधीयो का’ हे गीत सादर केले.फिरोजाबाद येथील हास्यव्यंग कवी मंजुल मयंक यांनी एक रचना सादर करून देशातील आजची वास्तवीक परिस्थिती मांडली. कवयित्री गुजरानी यांनी, ‘पुनम नाम है मेरा, चमकाना काम है मेरा’ हे गीत सादर केले. तर दवे यांच्या ‘बेटी’वरील कवितेने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले.या संमेलनाचे संचालन कवी दवे यांनी केले. आभार सरोज जायस्वाल यांनी मानले. मोठ्या संख्येत नागरिकांनी उपस्थिती दर्शवून कवी संमेलनाचा आस्वाद घेतला. संमेलनासाठी हितेंद्र बिसेन, सी.पी.गोपलानी, अनिल सहारे, अनिल गौतम, गुड्डू बिसेन, महेश करियार, मुक्तानंद ढोमणे, अभिजीत सहारे, मनिष कापसे, महेश तिवारी, महेश शर्मा यांच्यासह संस्थेच्या अन्य सदस्यांनी सहकार्य केले.पाहुण्यांनी केले कार्यक्रमाचे कौतुकसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार जैन यांनी, हे संमेलन देशात गोंदियाची एक ओळख म्हणून ओळखले जात असल्याचे सांगत एक उपलब्धी असल्याचे मत व्यक्त करीत आयोजकांच्या या कार्याचे कौतूक केले. तर माजी आमदार पटेल यांच्यासह अन्य पाहुण्यांनीही संमेलनाच्या या परंपरेचे संस्थेच्या पदाधिकाºयांचेही कौतूक केले.‘बेटी मा-बाप के सुख-दुख की सहेली और सहारा है,बेटी के मा-बाप का घर जन्नत से भी प्यारा है,बेटी परखोकी सबको चाहत होती है,फिर भी बेटी एक परायी अमानत होती है,विधाता ने जब पहली बार बेटी के बनाया होगा,तब बेटी के जुदाई मे फुट-फुट कर रोया होगा...
बेटी की जुदाई पर फुट-फुट कर रोया होगा ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 10:15 PM
आई-वडिलांच्या जीवनात मुलींची महत्ता सादर करणाऱ्या या नागदा येथील हास्य व्यंग कवी कमलेश दवे यांच्या कवितेने श्रोत्यांची वाहवाही लुटत कवी संमेलनात एकच समा बांधला.
ठळक मुद्देदवेंनी मांडली मुलींची महत्ता : थाटात पार पडले अखिल भारतीय कवी संमेलन