शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

डीसीपीएस व एनपीएसला नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 10:18 PM

१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाºयांसाठी शासनाने अन्यायकारी अंशदान पेंशन योजना लादली. या अन्यायकारी डीसीपीएस व एनपीएस योजनेचा सर्व कर्मचारी १६ सप्टेंबरपासून त्याग करीत असल्याचा निर्णय आमगाव येथील बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देसभेत घेतला निर्णय : शासनाने १० टक्के वाटा जमा केलाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाºयांसाठी शासनाने अन्यायकारी अंशदान पेंशन योजना लादली. या अन्यायकारी डीसीपीएस व एनपीएस योजनेचा सर्व कर्मचारी १६ सप्टेंबरपासून त्याग करीत असल्याचा निर्णय आमगाव येथील बैठकीत घेण्यात आला.कर्मचाºयांच्या पगारातून १० टक्के कपात करणे सुरु झाले. तेवढाच वाटा शासनसुध्दा जमा करेल, असे म्हटले होते. परंतु अद्यापही शासनाने १० टक्के वाटा जमा केलाच नाही. कर्मचाºयांच्या पगारातून १० टक्के कपात केल्याचा हिशेब सुध्दा मिळत नाही. यासाठी १० टक्के कपात बंद करावी, यासाठी तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, खंडविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कपात बंद व्हावी यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भविष्य सुधार असोसिएशन संलग्न महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने औरंगाबादच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.समान काम, समान वेतन, समान पेंशन हे १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या कर्मचाºयांना का? डीसीपीएस योजनेत निवृत्तीनंतर पेंशन किती मिळेल, हे सुध्दा निश्चित नाही. एखादा कर्मचारी मृत्यू पावल्यास त्याचे कुटूंब उघड्यावर पडते.डीसीपीएस व एनपीएस योजनेत १९८२ च्या जुनी पेंशन योजनेचे कोणतेही लाभ नाही. अशा अन्यायकारी, आर्थिक व मानसिक छळ करणाºया डीसीपीएस व एनपीएस योजनेच्या सर्व कर्मचाºयांनी १६ सप्टेंबर २०१७ पासून सामूहिक त्याग केला आहे. या बैठकीत महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे अध्यक्ष महेंद्र चौव्हाण, जयपाल ठाकुर, रोहीत हत्तीमारे, आनंद सोनवाने, दिनेश डोंगरे, राम सोनटक्के, नितीन रहांगडाले, प्रकाश ब्राम्हणकर, कोमल नेवारे, सुभाष बिसेन, ए.एम.बारेवार, डी.आर. राठौड, शितला येडे, एल.आर. पटले, वाय.एस. मेंढे, तारेश कुबडे, के.सी. कोंबडीबुरे, डी.पी. जांगडे, किरण बोरकर, डिगेश्वर टेंभरे, मनोज पंधरे, सी.डी. भांडारकर, ए.बी. गदेकर, एस.एम. बोपचे, शांता रहांगडाले, अंजन कावळे, विलास लंजे, एस.बी. कुसराम आदी कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.