गोंदिया : रविवारी (दि. ११) तब्बल १४ रुग्णांचा जीव घेऊन ७४५ बाधितांची भर पडल्यानंतर सोमवारी (दि. १२) थोडाफार दिलासा मिळाला असतानाच ४ रुग्णांच्या मृत्यूसह ५८१ बाधितांची जिल्ह्यात भर पडली आहे, तर २०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आता एकूण बाधितांची संख्या २१,३९७ झाली असून यातील १६,२७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आता जिल्ह्यात ४,८८८ रुग्ण क्रियाशील आहेत.
जिल्ह्यात सोमवारी (दि. १२) ५८१ बाधितांची भर पडली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४१९, तिरोडा ६१, गोरेगाव ३, आमगाव ११, सालेकसा ९, देवरी ४३, सडक-अर्जुनी २४, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ६, तर इतर राज्य व जिल्ह्यातील ५ रुग्ण आहेत. तर २०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील १०६, तिरोडा २६, गोरेगाव २, आमगाव ४५, सालेकसा ५, देवरी ७, सडक - अर्जुनी ११, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ५, तर इतर राज्य व जिल्ह्यातील २ रुग्ण आहेत.
यानंतर आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या २१,३९७ झाली असून, १६,२७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ४,८८८ क्रियाशील रुग्ण असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील २९८५, तिरोडा ५०९, गोरेगाव २०३, आमगाव २३५, सालेकसा ११७, देवरी १५४, सडक - अर्जुनी ३९६, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील २३५, तर इतर राज्य व जिल्ह्यातील ५४ रुग्ण आहेत. यातील ३५३५ रुग्ण घरीच अलगीकरणात असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील २४०१, तिरोडा ३१२, गोरेगाव ११६, आमगाव १०९, सालेकसा ७१, देवरी ८१, सडक - अर्जुनी २३७, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील १६९, तर इतर राज्य व जिल्ह्यातील ३९ रुग्णांचा समावेश आहे.
----------------------------
मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताच
जिल्ह्यात मागील ४ दिवसांपासून दररोज कोरोनामुळे रुग्णांचा जीव जात आहे. सोमवारी त्यात आणखी ४ रुग्णांच्या मृत्यूची भर पडली असून, आता ही संख्या २३३ एवढी झाली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील १३३, तिरोडा ३२, गोरेगाव ९, आमगाव १४, सालेकसा ५, देवरी १२, सडक - अर्जुनी ६, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील १२, तर इतर राज्य व जिल्ह्यातील १० रुग्णांचा समावेश आहे.
---------------------------------
१८९२ अहवाल प्रतीक्षेत
जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात तपासणी केली जात आहे. यामुळे बाधितांची आकडेवारीही सातत्याने वाढताना दिसत आहे. यामध्ये तपासण्यांचे अहवालही प्रलंबित राहात आहेत. मात्र, जेवढे जास्त अहवाल प्रलंबित तेवढे जास्त बाधित निघत असल्याचा अनुभव येत आहे. अशात सोमवारी १८९२ अहवाल प्रलंबित असल्याने आता मंगळवारी किती बाधितांची भर पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------------------