लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : फुलचूरच्या रामदेव कॉलोनी येथील स्विमींग पूल येथे पोहण्यासाठी गेलेल्या सिव्हील लाईन निवासी डॉ. ललित योगेंद्र कटरे (४३) यांचा उपचारादरम्यान शनिवारी सकाळी ९.२० वाजता गोंदिया सिटी हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मरणोपरांत नेत्रदान करुन दोन लोकांच्या अंधकारमय जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य केले. या कार्याचे समाजात कौतुक होत आहे.प्राप्त माहितीनुसार ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामदेव कॉलोनी येथील स्विमींग पूल येथे शुल्क भरुन पोहणे शिकण्यासाठी ते जात होते. १८ मे रोजी रात्री ९.१५ वाजता स्विमींग पूल व्यवस्थापनाच्या निष्काळजीमुळे पोहताना त्यांच्या नाका तोंडात पाणी गेल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते. डॉ. ललित कटरे यांच्या पत्नी डॉ. तृप्ती कटरे यांनी पती दिसत नसल्यामुळे शोधाशोध केल्यावर ते स्वीमिंग पुलाच्या पाण्यात ते बुडालेले दिसले. त्यांना लगेच बोहर काढून केएमजे हॉस्पीटलमध्ये दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. नागपूरवरून गुरूवारी (दि.२४) गोंदिया सिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.उपचारादरम्यान तेथे सकाळी ९.२० वाजता त्यांचा मृत्यू झाला. मागील दीड ते दोन महिन्यांपासून ते या स्विमींग पूलवर पोहण्यासाठी येत होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी डॉ. तृप्ती कटरे यांनी नेत्रदानाचा करण्याची ईच्छा व्यक्ती केली. जिल्हा सामान्य रूग्णालयात आणल्यावर डॉ. शैलजा दयानिधी यांनी त्यांचे नेत्र काढण्याची शस्त्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, बहिण, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. पतीचे नेत्रदान केल्यामुळे ते या जगाला पाहू शकतील अशी त्यांची धारणा आहे. केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून पार्थिव नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आला.निष्काळजीपणा केल्याचा व्यवस्थापकावर गुन्हासिव्हिल लाईन येथील डॉ. ललीत योगेंद्र कटरे हे १८ मे रोजी रात्री ९ वाजता फुलचूर येथील रामदेव कॉलनीतील स्विमिंग पूल मध्ये शुल्क भरुन पोहण्यासाठी गेले होते. परंतु प्रकाश जायस्वाल व व्यवस्थापक रामदेव कॉलनी फुलचूर या दोघांच्या निष्काळजीमुळे डॉ. ललीत कटरे हे स्विमिंग पूलमध्ये बुडाले. त्यांच्या नाका तोंडात व पोटात पाणी गेल्यामुळे गंभीर दुखापत झाली. सदर घटनेसंदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंवि कलम ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
स्विमींग पूलमध्ये बुडालेल्या ललित कटरेचा अखेर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:32 AM
फुलचूरच्या रामदेव कॉलोनी येथील स्विमींग पूल येथे पोहण्यासाठी गेलेल्या सिव्हील लाईन निवासी डॉ. ललित योगेंद्र कटरे (४३) यांचा उपचारादरम्यान शनिवारी सकाळी ९.२० वाजता गोंदिया सिटी हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मरणोपरांत नेत्रदान करुन दोन लोकांच्या अंधकारमय जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य केले.
ठळक मुद्देकुटुंबीयांनी केले मरणोपरांत नेत्रदान : स्विमींग पूल व्यवस्थापकावर गुन्हा दाखल