तो कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याला ८ एप्रिल रोजी उपचारासाठी गोंदियाच्या सहयोग हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी दाखल केले होते. तो या हॉस्पिटलच्या तिसऱ्या माळ्यावर असलेल्या आयसीयूमध्ये दाखल होता. दरम्यान, त्याने गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास आजाराला कंटाळून इमारतीवरून उडी घेतली. यात तो गंभीर झाला होता. यानंतर त्याच्यावर त्याच रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार घेताना २९ एप्रिलच्या रात्री त्याचा मृृत्यू झाला. रामनगर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. रामनगरचे ठाणेदार प्रमोद घोंगे या घटनेचा तपास करीत आहेत.
.....
सहयोग हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करा
शहरातील रिंग रोड परिसरातील सहयोग हॉस्पिटलच्या तिसऱ्या माळ्यारून उडी घेऊन कोविडबाधित रुग्णाने आत्महत्या केली. त्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अलीकडे या रुग्णालयासंदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सहयोग हाॅस्पिटलच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.