ठळक मुद्देगोंदिया वनपरिक्षेत्रातील दासगाव भागातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: येथील दासगाव परिसरात असलेल्या वनपरिक्षेत्रात शुक्रवारी संध्याकाळी एका सारस पक्ष्याचा विद्युत प्रवाहाने मृत्यू झाला. साधारणपणे दोन वर्ष वय असलेल्या या पक्ष्याला उडताना ११ के.व्ही.च्या विद्युत वाहिनीचा धक्का लागला होता. या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी वनविभागाला दिली. शनिवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी बोरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सुशीलकुमार नांदवटे, वनक्षेत्रपाल राऊत आदींनी या घटनास्थळी जाऊन पाहणी केली.