लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सप्टेंबरमध्ये देखील चांगलाच वाढतांना दिसत आहे.आज तीन रुग्णांचा मृत्यू झाला.१२१ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले तर ३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.४७० अहवालाची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ३ रुग्ण हे बाहेर जिल्हा किंवा राज्यातील आहे.आज सहा सप्टेंबर रोजी गोंदिया मेडिकल कॉलेज येथे सिव्हील लाईन गोंदिया येथील ७५ वर्ष रुग्णाचा मृत्यू झाला. बालाघाट येथील ७३ रुग्णाचा गोंदिया येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.गोरेगाव येथील ४२ वर्षीय रुग्णाचा किडनी विकाराच्या उपचारासाठी गोंदियात नातेवाईकाकडे आला असता त्यांच्या घरी मृत्यू झाला.जिल्हयात कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची शक्यता आहे किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी विषाणू प्रयोगशाळेतून किंवा रॅपिड अँटिजेन चाचणीतून करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत प्रयोगशाळा चाचणीतून १६०८ नमुने आणि रॅपिड अँटिजेन चाचणीतून ७७२ नमुने असे एकूण २३८० नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ताप, खोकला, सर्दी असलेल्या रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तर गोंदिया शहरातील नागरिकांनी ८ ठिकाणी सुरु असलेल्या तपासणी केंद्रामध्ये जावून स्वॅबचे नमूने देवून कोरोनाविषयक चाचणी करुन घ्यावी. तसेच कोरोनविषयक मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे.
गोंदिया जिल्ह्यात तीन बाधित रुग्णांचा मृत्यू; ११७७ रूग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 9:18 PM
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सप्टेंबरमध्ये देखील चांगलाच वाढतांना दिसत आहे.आज तीन रुग्णांचा मृत्यू झाला.१२१ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले तर ३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.४७० अहवालाची प्रतीक्षा आहे.
ठळक मुद्दे१२१ नवे कोरोना पॉझिटिव्ह तर ३४ कोरोनामुक्त४७० अहवाल प्रलंबित