लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना बाधितांचा आलेख खालावला असला तरी बाधितांच्या मृत्यूचा ग्राफ वाढत असल्याने चिंता कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून बाधितांच्या मृत्यूचा दर १.२४ टक्के आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने ही बाब जिल्हावासीयांसाठी दिलासादायक आहे.जिल्ह्यात मंगळवारी (दि.२७) नवीन १०० कोरोना बाधितांची भर पडली. तर १३० कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. तर तिरोडा आणि देवरी तालुक्यातील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला. मंगळवारी आढळलेल्या १०० कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ५२ कोरोना बाधित हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ४, गोरेगाव ६, आमगाव १७, सालेकसा ६, देवरी २, सडक अर्जुनी ४ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ९ बाधितांचा समावेश आहे. मागील आठवडाभरापासून कोरोना बाधितांचा आलेख वर खाली होत आहे. मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६१ टक्के आहे. त्यामुळे निश्चितच दिलासादायक बाब आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ३७ हजार ४७३ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी २८ हजार ४३९ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरीत शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ३४ हजार ५३५ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ३१०४० नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर ३४९५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९४४२ जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून यापैकी ८४८४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या स्थितीत ८३६ कोरोना ॲक्टीव्ह रुग्ण असून ५१ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे.
बाधितांचा मृत्यू दर १.२४ टक्क्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 5:00 AM
जिल्ह्यात मंगळवारी (दि.२७) नवीन १०० कोरोना बाधितांची भर पडली. तर १३० कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. तर तिरोडा आणि देवरी तालुक्यातील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला. मंगळवारी आढळलेल्या १०० कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ५२ कोरोना बाधित हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ४, गोरेगाव ६, आमगाव १७, सालेकसा ६, देवरी २, सडक अर्जुनी ४ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ९ बाधितांचा समावेश आहे.
ठळक मुद्दे१०० नवीन बाधितांची भर : १३० बाधितांनी केली कोरोनावर मात