ऑनलाईन लोकमतसालेकसा : आमगाव खुर्द सालेकसा नगर पंचायतमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या साखळी उपोषणातील दोघांची प्रकृती खालावल्याची भिती व्यक्त करीत तालुका प्रशासनाने त्यांना दवाखान्यात भर्ती करण्यासाठी गुरूवारी (दि.२२) पोलिसांना पाचारण केले. मात्र आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना अडविल्याने काही वेळ पोलीस व आंदोलनकर्त्यांत वाद निर्माण झाला होता. मात्र दोघांनी प्रकृती बरी असल्याचे सांगीतल्यावर हा वाद निवळला व स्थिती नियंत्रणात आली.१९ तारखेपासून मुरलीधर कावडे व विष्णू वशिष्ठ हे उपोषणावर बसले असून त्यांच्या प्रकृती खालावल्याची भिती तालुका प्रशासनाला वाटली. यावर त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी गुरूवारी (दि.२२) सरकारी दवाखान्यातील डॉक्टरला बोलावून तपासणी करण्यात आली. यात त्यांनी दोघांना दवाखान्यात भर्ती करावे लागेल असे सांगीतले.त्यानुसार तालुका प्रशासनाने पोलिसांना बोलाविले. मात्र आंदोलनकर्त्यांनी खासगी डॉक्टरला बोलावून तपासणी केली असता त्यांनी बीपी व शुगर व्यवस्थीत असल्याचे सांगितले. यावरून आंदोलनकर्ते व पोलिसांत वाद झाला. मात्र दोघांनी आपली प्रकृती बरी असल्याचे सांगीतले व हा वाद निवळला.न्यायालयाची शासनाला फटकारआमगाव खुर्दला समाविष्ट करण्याच्या प्रकरणावरून गुरूवारी (दि.२२) उच्च न्यायालयाने राज्य शासनाला फटकार लावून विना अट समाविष्ट करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. यावर शासनाने आपली बाजू मांडत आमगाव खुर्दला समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असून ३० दिवसांत आक्षेप व सूचना देण्याची मुदत दिल्याचे सांगीतले. परंतु न्यायालयाने याला समाधानकारक न मानता विना अट सरळ समाविष्ट करण्याची घोषणा करण्याचे आदेश दिले अहे. त्यामुळे येत्या सोमवारी (दि.२६) शासनाकडून कोणती घोषणा केली जाते याची प्रतीक्षा करावी लागेल. मात्र तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.उपोषणावर बसलेल्या नागरिकांच्या प्रकृतीची चिंता करणे तालुका प्रशासनाची जबाबदारी आहे. अशात त्यांना दवाखान्यात भर्ती करण्यासाठी आपले कर्तव्य बजावणे आवश्यक आहे.- मोहन खांदारेपोलीस निरीक्षक, सालेकसाउपोषणकर्त्यांना दवाखान्यात भर्ती करून सर्वांचे लक्ष विकेंद्रीत करीत आंदोलन उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा डाव आहे. परंतु आम्ही शासनाचा डाव उधळून लावू.-आंदोलनकर्ते
आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावल्यावरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 9:33 PM
आमगाव खुर्द सालेकसा नगर पंचायतमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या साखळी उपोषणातील दोघांची प्रकृती खालावल्याची भिती व्यक्त करीत तालुका प्रशासनाने .....
ठळक मुद्देपोलिसांना रोखण्याचा प्रयत्न : काही वेळ तणावानंतर परिस्थिती नियंत्रणात