राजेंद्र जैन : शेतकऱ्यांसह सर्वांना सहभागी करणार गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते खा.प्रफुल्ल पटेल यांनी घोषीत केलेल्या कर्जमुक्ती आंदोलनाची तयारी करण्यासाठी गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी आ.राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय, रेलटोली गोंदिया येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात कर्जमुक्ती आंदोलनाचे आयोजन करण्याची भूमिका तयार केली. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, माजी आ.दिलीप बंसोड, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, पूर्व जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, मनोहर चंद्रिकापुरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी, शेतमजूर, बेरोजार व गृहणीच्या भाजपा शासनाच्या काळात होत असलेल्या हालअपेक्षाबद्दल जनजागृती करून आंदोलनात सहभागी करण्याचे विचार या सभेत मांडण्यात आले. दि. १७ ते २६ एप्रिल २०१७ या कालावधीत सर्व तालुक्यातील मुख्यालयाच्या ठिकाणी आंदोलन उभारण्यासाठी कार्यक्रम आखण्यात आले. दि. १७ एप्रिलला सालेकसा तालुका, १८ ला देवरी तालुका, १९ ला गोरेगाव तालुका, २१ ला आमगाव तालुका, २२ ला अर्जुनी-मोरगाव तालुका, २४ ला तिरोडा तालुका, २५ ला गोंदिया तालुका तर २६ ला सडस अर्जुनी तालुका अशा प्रकारे तालुक्याच्या ठिकाणी कर्ज मुक्ती आंदोलन करण्यात येईल. यासर्व ठिकाणी जिल्ह्यापातळीचे पदाधिकारी उपस्थित राहून तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात मार्गदर्शन करणार आहेत. सभेत गोंदिया शहर अध्यक्षपदी नवनियुक्त अशोक सहारे यांचा सत्कार करण्यात आला. सभेचे आभार जिल्ह्याचे कृषी सभेचे अध्यक्ष मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी केले. या सभेला प्रमुख्याने तालुका अध्यक्ष कुंदन कटारे, बालकृष्ण पटले, केवल बघेले, नामदेव डोंगरवार, प्रभाकर (बबलु) दोनोडे, प्रेमकुमार रहांगडाले, कमलबापू बहेकार, टिकाराम मेंढे, पंचम बिसेन, देवचंद तरोणे, सुखराम फुंडे, मोहन पटले, गणेश बरडे, जितेश टेंभरे, राखी ठाकरे, विनोद कन्नमवार, रमन डेकाटे, एफ.आर.टी.शहा, संतोष रहांगडाले, गुड्डू बिसेन, मुन्ना तुरकर आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
शेतकरीविरोधी शासनाच्या विरोधात कर्जमुक्ती आंदोलन
By admin | Published: April 06, 2017 1:09 AM