शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
3
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
4
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
5
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
6
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
7
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
8
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
9
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
10
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
11
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
12
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
13
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
14
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
15
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
16
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
18
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
19
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
20
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 

जिल्ह्यातील ५६ हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2017 1:04 AM

राज्य सरकारतर्फे केलेल्या कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेंतर्गत येणाऱ्या विविध सहकारी संस्थाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करणे बंद केले आहे.

३० जून २०१६ पर्यंतचे कर्ज माफ : दीड लाख रुपये कर्जाची मर्यादालोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारतर्फे केलेल्या कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेंतर्गत येणाऱ्या विविध सहकारी संस्थाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करणे बंद केले आहे. परंतु कर्जमाफीचा लाभ ३० जून २०१६ पर्यंतच कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना होणार आहे. कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ६२ टक्के शेतकऱ्यांनाच या कर्जमुक्तीचा फायदा होणार आहे. यामुळे उर्वरीत शेतकऱ्यांकडून जिल्हामध्यवर्ती बँक सक्तीने वसुली करीत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके अंतर्गत येणाऱ्या विविध संस्थानी सन २००९ नंतर २ जून २०१७ पर्यंत ९१ हजार ३४६ अल्प, मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांना ३२६ कोटी ५३ लाख रूपये कर्ज वाटप केले. या कर्जाचा अहवाल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शासनाला पाठविला आहे. यात ७२ हजार ४६७ अल्प व मध्यम शेतकऱ्यांनी २५४ कोटी १७ लाख रूपयाचे कर्ज घेतले. या कर्ज घेणाऱ्या २८ हजार १७१ शेतकऱ्यांनी ८४ कोटी २५ लाख रूपयाचे कर्ज भरले आहे. परंतु २४ जून रोजी सरकारने ३० जून २०१६ पर्यंतची कर्जमाफी केली आहे. यामुळे ९१ हजार ३४६ कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी ५६ हजार ५५७ शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. २९० कोटी १७ लाख रूपये कर्ज माफ केले जाणार आहे. सन २०१६-१७ व सन २०१७-१८ मध्ये २ जून पर्यंत ५१ हजार ५४२ मोठे, मध्यम व अल्प भूधारकांना १८३ कोटी ६४ लाख ६७ हजार रूपयाचे कर्ज विविध सहकारी संस्थांमार्फत देण्यात आले आहे. यात ४८ हजार ३३५ लघु व मध्यम शेतकऱ्यांचा समावेश आहे. लघु व मध्यम शेतकऱ्यांना १५१ कोटी ६३ लाख ९९ हजार रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. ३५ हजार शेतकरी राहणार वंचित४शासनाने ३० जून २०१६ पर्यंतच्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याने गोंदिया जिल्ह्यातील ३४ हजार ७९० शेतकरी कर्जाच्या ओझ्याखालीच दबून राहतील. ९१ हजार ३४६ शेतकऱ्यांनी ३२६ कोटी ५३ लाख रूपयाचे कर्ज घेतले. परंतु ५६ हजार ५५७ शेतकऱ्यांचे २९० कोटी १७ लाख कर्ज माफ होणार आहे. ३४ हजार ७९० शेतकऱ्यांचे ३६ कोटी ३६ लाख रूपये कर्जमुक्तीच्या नियमात बसणार नाहीत. त्यामुळे ते कर्जमाफी पासून वंचीत राहणार आहेत.राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. शेतकऱ्यांचे दीड लाख रूपयापर्यंत कर्ज माफ केले जाणार आहे. ३० जून २०१६ पर्यंतच्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. -व्ही.आर.वासनिक प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोंदिया