अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम सिलेझरी येथील भारत टेंभुर्णे हा आई, पत्नी, मुलगा (५) मुलगी (३) यांच्यासह राहत होता. त्याच्याकडे वडिलोपार्जित पावणेतीन एकर शेतजमीन होती. घरी एकटाच कर्ता पुरुष होता व शेतीवरच त्याच्या कुटुंबाचा गाडा चालत होता. गावातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेकडून त्याने ३८ हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. यावर्षीच्या नाापिकीमुळे कर्जाची परतफेड कशी करणार, या चिंतेच तो गुरफटून गेला होता. अशातच गुरुवारी सकाळी तो शेतात गेला. कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळताच सपोनि. प्रशांत भुते, बीट अंमलदार देवीदास कन्नाके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अर्जुनी- मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी पोलीस स्टेशनला मार्ग दाखल करण्यात आला आहे.
कर्जापायी युवा शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 4:18 AM