नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पारंपरिक शेती म्हणून सिंगाडा व्यवसाय करणाऱ्या लोकांवर आता उपासमारीचे संकट ओढवत चालले आहे. त्यांच्या रोजगाराकडे शासनाने सहानुभूतीने लक्ष दिले नाही. परंतु, सौंदर्यीकरणाच्या नावावर सिंगाडा रोजगार संपविण्याचे कटकारस्थान महाराष्ट्र शासनाने रचले असल्याचा सूर हा व्यवसाय करणाºया लोकांकडून येत आहे.गोंदिया जिल्ह्यात शासकीय व खाजगी अशा २०० तलावांमध्ये सिंगाडा शेती केली जाते. पूर्वी तलावांची संख्या अधिक होती. परंतु, आता ती संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. गावातील पाणी ज्या तलावात जाते त्या तलावात सिंगाडा शेती अधिक जोमात होते. परंतु गावाशेजारी असलेल्या शासकीय तलावांचे सौंदर्यीकरण करण्याच्या नावावर शासनाने पिढ्यानपिढ्या सिंगाडा शेती करणाऱ्यांचा रोजगार हिसकावला आहे. शासकीय ७५ टक्के तलावांचे सौंदर्यीकरण करण्याच्या नावावर शासनाने सिंगाडा व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे या व्यवसायाशी जुळलेल्या लोकांवर आता बेरोजगारीचे सावट येत आहे.जिल्ह्यातील ५ हजार नागरिक हा व्यवसाय करीत असल्याची माहिती मच्छीमार संस्था (बनगाव) सदस्य दुर्गाप्रसाद रहेकवार यांनी दिली आहे. मे महिन्यात सिंगाडा लागवड करण्यासाठी सिंगाड्याचे वेल तलावात नेऊन टाकले जाते. यासाठी पंचायत समितीकडून किंवा खाजगी शेत मालकांकडून लीजवर तलाव घेतले जातात.साडे तीन महिन्यांनंतर सिंगाड्याचे पीक येते. अवघ्या आॅगस्ट ते नोव्हेंबर या ४ महिन्यांच्या काळात २०-२० दिवसांचे अंतर ठेवून एका तलावातून ४ वेळा सिंगाड्यांची तोडणी केली जाते. एका तलावातून ३० हजारांचे उत्पन्न त्या शेती करणाºया व्यक्तीला होते. एका तोडणीत एक क्विंटल सिंगाडे निघतात. ४ तोड्यात ४ क्विंटल सिंगाडे एका तलावातून काढत असल्याची माहिती भवभूतीनगर येथील गंगाराम बर्वे यांनी दिली.शासनाने सिंगाडा व्यवसाय करणाºयांकडे लक्ष न दिल्यामुळे ते उपेक्षित आहेत. उलट शासनाने सौंदर्यीकरणाच्या नावावर त्यांचे तलाव हिसकावून घेतले आहेत.रोगांचा प्रादुर्भावधानाबरोबर सिंगाडा व रही, मावा, करपा हा रोग लागतो. त्यामुळे सिंगाड्याची पाने गळून नष्ट होतात. ज्या तलावात सिंगाड्याची शेती केली जाते त्या तलावात मासेमारीचा व्यवसाय ही करता येत नाही. पाण्यातील माशांंना आॅक्सिजन मिळत नसल्यामुळे तेथे माशांचा व्यवसाय करता येत नाही. सिंगाड्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास बहुदा त्या लागवडीसाठी लावलेला पैसा ही निघत नसल्याची खंत भवभूतीनगर येथील श्रीकिशन सोनारे यांनी व्यक्त केली.खर्च अधिक उत्पन्न कमीसिंगाडावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने वारंवार फवारणीसाठी पावडर लागते. फळ यावे यासाठी औषधांची फवारणी केली जाते. पीक निघाल्यानंतर बाजारात नेण्यासाठी सिंगाड्यांना उकळावे लागते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडांची गरज असते. ८ महिन्यांची शेती असूनही एका तलावातून ३० हजार रुपयांचे उत्पन्न निघते. त्यात लागवडीसाठी येणारा खर्च १५ हजारांच्या घरात असल्याने हा व्यवसाय परवडत नसल्याची माहिती दसेलाल मानकर यांनी दिली.‘‘शासनाने सौंदर्यीकरण करण्याच्या नावावर आमचा रोजगार हिसकावला. त्यासाठी आमचा लढा सुरू आहे. परंतु आमच्याकडे शासन किंवा कोणतेही लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे हा व्यवसाय करणाºयांवर आर्थिक संकट ओढावले आहे. मोठी मेहनत करूनही बाजारात नेलेल्या सिंगाड्यांचा भाव ग्राहक करतात त्यावेळी अधिकच खंत होते.-श्रीकांत सोनारेशिंगाडा शेती करणारे, भवभूती नगर आमगाव.‘‘सिंगड्यामध्ये सगळ्याच प्रकारचे मिनरल असते. कार्बोहायड्रेड, कॅल्शीयम, पोटॅशियम असते. लहान मुलांना हे देणे चांगले आहे. हे वर्षातून एकदा येणारे फळ असल्यामुळे सगळ्यांनीच खावे. यापासून अपायकारक असे काहीच नाही.- डॉ. मौसमी ब्राम्हणकरआहार तज्ज्ञ, गोंदिया.
सौंदर्यीकरणामुळे सिंगाड्याला उतरती कळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 9:11 PM
पारंपरिक शेती म्हणून सिंगाडा व्यवसाय करणाऱ्या लोकांवर आता उपासमारीचे संकट ओढवत चालले आहे. त्यांच्या रोजगाराकडे शासनाने सहानुभूतीने लक्ष दिले नाही. परंतु, सौंदर्यीकरणाच्या नावावर सिंगाडा रोजगार संपविण्याचे कटकारस्थान महाराष्ट्र शासनाने रचले असल्याचा सूर हा व्यवसाय करणाºया लोकांकडून येत आहे.
ठळक मुद्देशासनाचे सपशेल दुर्लक्ष : जिल्ह्यातील ५ हजार नागरिक या रोजगारात