लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती झाली असून शेतकºयांनी धान पिकाची रोवणी केलीच नाही. नर्सरी जशाच्या तशाच आहेत. शेतात कचरा उगवला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सावकराकडून व घरातील शिल्लक असलेल्या पैशांतून बियाणे खरेदी केले होते. तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करून दर हेक्टरी ३० हजार रूपये मदत देण्याची मागणी तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे.धान पीकासाठी खत घेतले ते तसेच पडून आहे. पिण्याचे पाणी, चारा टंचाई, कर्जाचे डोंगर वाढत आहे. मुलांचे शिक्षण, घर, मुलीचे लग्न, ऐक ना अनेक प्रश्न शेतकºयांसमोर पुढे आहेत. शेतकºयांची कर्ज माफी फक्त कागदावरच आहे.शेतकºयांना सरसकट कर्जमाफी, कर्जवसुली स्थगिती, प्रती हेक्टर ३० हजार रुपये मदत, उपसा सिंचन योजना, कृषी कनेक्शन, विद्युत बील माफ करावे, पेट्रोल डिझेल दर कमी करावे, चारा छावणी तयार करावी, अश्या विविध मागण्यांचे निवेदन तिरोडा येथील तहसीलदारांना देण्यात आले.निवेदन देणाºया शिष्टमंडळात तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राधेलाल पटले, प्रदेश सचिव डॉ. योगेंद्र भगत, माणिक झंझाळ, रुबीना मोतीवाला, पूनम रहांगडाले, प्रा. विलास मेश्राम, नरेंद्र रहांगडाले, भूपेंद्र बैस, गिरधर बिसेन, शोभेलाल दहीकर, अमृतलाल असाटी, दिलीप असाटी, प्रदीप पटले, देवराव चौधरी, दिलीप ढाले, हितेंद्र जांभुळकर, किशोर कोटांगले, मेकचंद पारधी, प्रेम पारधी, प्रेम पटले, शाहील मालाधारी, धमेंद्र बिसेन, जितेंद्र बाविसताले, अनिल अंबुले उपस्थित होते.
तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 8:38 PM
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती झाली असून शेतकºयांनी धान पिकाची रोवणी केलीच नाही. नर्सरी जशाच्या तशाच आहेत. शेतात कचरा उगवला आहे.
ठळक मुद्देतालुका काँग्रेस कमिटीची मागणी :तहसीलदारांना दिले निवेदन