सीरेगावबांधची जिल्ह्यात स्मार्ट ग्राम म्हणून ओळख आहे. आतापर्यंत अनेक राज्य आणि केंद्राच्या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या या गावात मानाचा आणखी एक तुरा रोवण्यात आला. गावातील विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राची सुरुवात आणि जिल्हा परिषद शाळेच्या प्रत्येक वर्गखोलीला स्मार्ट टीव्ही कक्षात रूपांतर करण्यात आले. विशेष म्हणजे, या दोन्ही उपक्रमांचे लोकार्पण वर्ग १० वीत ७५ टक्के गुण प्राप्त गुणवंत विद्यार्थी सौरभ निलाराम लंजे, प्रवीण डोलन लंजे, हितेश भुदास कापगते, महेश्वरी प्रकाश पचारे, पायल मिलिंद चिमनकर, अश्विनी नरहरी चिमनकर, क्रेझा हेमकृष्ण संग्रामे तसेच १२ वीतील विद्यार्थी जनार्धन खेमराज कापगते आणि जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थी सुहास चोपराम चाचेरे, अंजली प्रमोद गहाने, प्रेमकुमार रेशीम गहणे, टोमेश्वरी रेशीम गहाणे, गौरव मारोती मुंगमोडे, गुंजन हिरालाल मसराम, श्रेया राजेश डोंगरवार व वैष्णवी भागवत गहाने यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी सरपंच संग्रामे, उपसरपंच हिरालाल मसराम, ग्रामसेवक टी.टी. निमजे, मुख्याध्यापक रामटेके, ग्रामपंचायत सदस्य, शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश सुखदेवे, तंमुस अध्यक्ष राजीराम कापगते उपस्थित होते.