याप्रसंगी अग्रवाल यांनी, एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासकामांचे लोकार्पण करताना आनंद होत असून, जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास अतूट व अटल राहावा यासाठीच मी वचनपूर्ती करीत असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान, त्यांच्या हस्ते ३० लाख रुपयांच्या निधीतून तयार पांजरा-सिंदीटोला रस्ता, ४१.५५ लाख रुपयांच्या झिलमीली-चिरामनटोला रस्ता, २४ लाख रुपयांच्या मोगर्रा-परसवाडा रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी कुंदन कटारे, भाऊराव ऊके, छत्रपाल तुरकर, धनजंय तुरकर, ज्ञानचंद जमईवार, लखन हरिणखेड़े, चेतन बहेकार, चेताली नागपुरे, पृथ्वीसिंह नागपुरे, उपसरपंच रामप्रसाद लिल्हारे, रामराज खरे, परसराम हुमे, इंदलसिंग राठौर, रामेश्वर रहमतकर, मुरलीधर येडे, फिरोज बंसोड, विक्की बघेले, गंगाराम कापसे, अमृतलाल कवरे, बिरज ऊके, परमानंद खोब्रागडे, भागचंद हरिणखेडे, बंडू नागपुरे, उपसरपंच सूर्यमणी रामटेके, जीतलाल पाचे, दिनेश तुरकर, श्यामलाल बागडे, गेंदलाल फरकुंडे, महेंद्र श्यामकुँवर, नीरज रामटेककर, मुकुंद रामटेके, धर्मलक्षित गजभिये उपस्थित होते.
साडेतीन कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:19 AM