दानवीर नंदेश्वर हे गांगला निवासी असून महावितरण कंपनीच्या गोंदिया ग्रामीण फुलचूर वीज वितरण केंद्रातून मार्च २०१९ ला चीफ फोरमन पदावरून निवृत्त झाले आहेत. ते एक सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृृतीनिमित्त गांगला येथे शिवालयाच्या मार्गावर स्वखर्चातून प्रवेशव्दार तयार करुन दिले. यावेळी आयाेजित लोकार्पण कार्यक्रमाला समितीचे सचिव दुलीचंद बुध्दे, अध्यक्ष बालाराम साठवणे, संजय बुध्दे, सुनील ठवकर, सरपंच सोनाली बुध्दे, माजी पं.स.सदस्य जया धावडे, रामसागर धावडे, रेशीम कापगते, उपसरपंच सुभाष वडीचार, सरपंच ठाकरे, सरपंच रहांगडाले, सुखदेव गौतम, भूपेंद्र रोडगे, तंमुस अध्यक्ष शैलेंद्र वनवे, मोनू बांडेबुचे, फुलचंद पालेवार, संतोष साठवणे, टेंभेकर, अमित नंदेश्वर, नवसागर रहांगडाले, नीरज असाटी, महेश साठवणे, सुधीर नंदेश्वर, शुभम वंजारी, जवाहर पटले, ईश्वर टेंभेकर उपस्थित होते.
गांगला येथील शिवालयाच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 4:25 AM