लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा ते देव्हाडा रस्त्याची अंत्यत दुर्दशा झाली असून पावसाळ्यात या मार्गावरुन ये-जा करणे कठीण झाले आहे. मात्र अद्यापही रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही.घाटकुरोडा गावातून वैनगंगा नदीच्या काठावर रेतीघाट असून या घाटावरुन दररोज रेती भरलेल्या ट्रक व ट्रॅक्टरची या रस्त्यावरुन वर्दळ सुरू असते. वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक केली जात असल्याने या परिसरातील रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचून रस्त्यावर डबके तयार झाले आहे. यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. याच रस्त्यावरुन विद्यार्थी आणि परिसरातील गावकरी ये-जा करतात. त्यामुळे त्यांना सुध्दा या रस्त्याचा फटका सहन करावा लागत आहे.पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखल तयार होत असून यावरुन दुचाकी व चारचाकी वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. घाटकुरोडावरुन पायी जाणाºया नागरिकांना चिखलामुळे कपडे खराब होत असल्याने समस्या होत आहे. देव्हाडा येथे एलोरा पेपर मिल असल्यामुळे घोगरा, पाटीलटोला येथील कामगार याच रस्त्याने ये-जा करतात. तसेच घाटकुरोडावरुन रेती भरलेले जड वाहतुकीचे ट्रक देव्हाडा या रस्त्याने सरळ नागपूर, गोंदियाकडे जातात.पावसाळ्याला सुरुवात होवून सुध्दा या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाºया गावकरी आणि वाहन चालकांची चांगलीच गैरसोय होत आहे. शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी मानव विकास योजनेंतर्गत एस.टी.बस सुरु करण्यात आली आहे. तुमसर आगाराची प्रवासी बस सुरु करण्यात आली आहे.मात्र घाटकुरोडा ते देव्हाडा हा रस्ता जीर्ण झाला असून ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. रस्त्याच्या दुर्दशेमुळे या मार्गावरील बससेवा बंद होण्याच्या मार्गावर आहे. संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची चौकशी करुन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
घाटकुरोडा ते देव्हाडा रस्त्यांची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 9:57 PM
तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा ते देव्हाडा रस्त्याची अंत्यत दुर्दशा झाली असून पावसाळ्यात या मार्गावरुन ये-जा करणे कठीण झाले आहे. मात्र अद्यापही रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. घाटकुरोडा गावातून वैनगंगा नदीच्या काठावर रेतीघाट असून या घाटावरुन दररोज रेती भरलेल्या ट्रक व ट्रॅक्टरची या रस्त्यावरुन वर्दळ सुरू असते.
ठळक मुद्देरेतीची अवैध वाहतूक सुरुच : संबंधित विभागाचे दुर्लक्ष, गावकऱ्यांची अडचण