लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहारच्या जयस्तंभ चौकात तहसील कार्यालयाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीसमोरील अतिक्रमण हटवितांना दुकानदारांनी तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसोबत धक्काबुक्की केली. ही घटना बुधवारी (दि.३) दुपारी जयस्तंभ चौक परिसरात घडली.दरम्यान या प्रकारामुळे या परिसरात काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शहराच्या तहसील कार्यालयाच्या जागेवर प्रशासकीय भवन तयार करण्यात आले. या भवनासमोर काही दुकानदारांनी अतिक्रमण केले. या अतिक्रणाला हटविण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दुकानदारांनी धक्काबुक्की केली.यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी अनुसया जगने, सत्यशीला मोहबे व मन्नू राठोड या तिघांवर भादंविच्या कलम ३५३, १८६,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रशासकीय भवनासमोर व आजूबाजूला टपºया लावून काहींनी अतिक्रमण केले आहे.विशेष म्हणजे सायंकाळच्यावेळी या अतिक्रमण धारकांजवळ खूपच गर्दी असते. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या वाटसरूंना त्रास सहन करावा लागतो. चहा-पान,अंडी, फळ विक्री करण्याचे काम या ठिकाणी केले जात होते. सायंकाळच्या वेळी काही लोक दारू पिऊन या ठिकाणी येत होते. त्या ठिकाणी नाश्ता करताना धिंगाणा व्हायचा.या अतिक्रणाला हटविण्यासाठी अप्पर तहसीलदार के.डी. मेश्राम यांच्या नेतृत्वात एक चमू अतिक्रमण हटविण्यासाठी बुधवारी दुपारी गेली. दरम्यान अतिक्रमण हटविण्याची कारवाई करीत असताना सत्यशीला मोहबे व अनुसया जगने यांनी कारवाईचा विरोध केला. मन्नू ठाकूर नावाच्या व्यक्तीने त्यांना सहकार्य केले. कारवाई करण्याचे अधिकारी धाडस दाखवित होते तर अतिक्रमणधारक विरोध करीत होते. दरम्यान धक्काबुक्की करण्यात आली. यासंदर्भात मंडळ अधिकारी भेंडारकर यांनी या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसात तक्रार केली.या कारवाईच्या वेळी स्वत: ठाणेदार मनोहर दाभाडे उपस्थित होते. महसूल विभागाकडून या अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती.काही लोकांनी स्वत: अतिक्रमण काढल्याचे अप्पर तहसीलदार मेश्राम यांनी सांगितले. या अतिक्रमण हटाव मोहीमेमुळे दुकानदारांमध्ये रोष आहे.
अतिक्रमण हटविताना कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 9:33 PM
शहारच्या जयस्तंभ चौकात तहसील कार्यालयाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीसमोरील अतिक्रमण हटवितांना दुकानदारांनी तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसोबत धक्काबुक्की केली. ही घटना बुधवारी (दि.३) दुपारी जयस्तंभ चौक परिसरात घडली.
ठळक मुद्देवातावरण तापले : तिघांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल