कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आणीबाणीच्या स्थितीत महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या येथील अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. पदे रिक्त असल्यामुळे विभागाने आणखी ६७ पदांची मागणी केली असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. रिक्त पदांमुळे मात्र विभागाच्या सेवेवर परिणाम पडत असून शिवाय याचा ताण कार्यरत कर्मचाऱ्यांवर येत आहे.कोठेही आग लागल्याची घटना घडल्यास सर्वप्रथम आठवण येते ती अग्निशमन वाहनाची. शिवाय आणिबाणीच्या परिस्थितीतही अग्निशमन विभाग धावून येतो. यावरून अग्निशमन विभागाचे महत्व लक्षात येते. म्हणूनच अग्निशमन विभागाला पाहिजे त्या सुविधा पुरविणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. अग्निशमन विभाग परिपूर्ण असल्यास त्याचा फायदा जनतेलाच मिळतो. मात्र खेदाची बाब अशी की, येथील अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. विभागातील काही मुख्य पदांचाच विचार केल्यास तिही पूर्णपणे भरलेली नसल्याचे दिसत आहे.विभागातील या रिक्त पदांमुळे एकतर सेवेवर परिणाम पडतो. शिवाय विभागात कार्यरत कर्मचाºयांवर याचा ताण पडत आहे. विशेष म्हणजे, शासनाने अग्निशमन विभागासाठी २५ पदे मंजूर केल्याची माहिती आहे. त्यानुसार, येथील अग्निशमन विभागाकडून पदनिहाय किती कर्मचारी लागतील याचा प्रस्तावच शासनाला पाठविण्यात आला होता. मात्र त्यानंतर शासनाकडून सुधारीत प्रस्ताव मागविण्यात आला. त्यात अग्निशमन विभागाने तीन पाळ््यांना घेत ६७ पदांची मागणी केली आहे.अशी केली पदांची मागणीअग्निशमन विभागाकडे सध्या प्रमुख अग्निशामकाची (लिडींग फायरमन) दोन पदे मंजूर असून तेथे १० पदांची, वाहन चालक-पंप आॅपरेटरची चार पदे मंजूर असून तेथे ११ पदांची तर अग्निशामकची (फायरमन) ६ पदे मंजूर असून तेथे ४६ पदांच्या म्हणजेच एकूण ६७ पदांच्या निर्मितीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, अग्निशमन विभागातील या मंजूर पदांमधीलही काही पदे रिक्त पडून आहेत. अशात विभागात सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.अशी आहेत रिक्त पदेअग्निशमन विभागातील मुख्य काही पदांचीच पाहणी केल्यास आजघडीला लिडींग फायरमनची दोन पदे मंजूर असून त्यातील एक पद रिक्त आहे. वाहन चालक-आॅपरेटरची चार पदे मंजूर असून त्यातील दोन पदे रिक्त आहेत. फायरमनची सहा पदे रिक्त असून एक पद रिक्त आहे. अशाप्रकारे १२ पैकी चार पदे रिक्त आहे. त्यामुळे विभागात सध्या ७ वाहनचालक कंत्राटी तत्वावर कार्यरत असून १२ फायरमन रोजंदारीने काम करीत आहेत.५ वर्षांपासून अग्निशमन अधिकाऱ्यांचे पद रिक्तसुमारे पाच वर्षांपासून येथील अग्निशमन अधिकाऱ्यांचे पद रिक्त पडून आहे. त्यामुळे येथील लिडींग फायरमनकडे प्रभार दिला जात असल्याची परंपरा सुरू आहे. सध्या लिडींग फायरमन छबीलाल पटले यांच्याकडे अग्निशमन अधिकाऱ्यांचा प्रभार देण्यात आला आहे. याशिवाय अग्निशमन सह अधिकाऱ्यांचेही पद मागील १० वर्षांपासून रिक्त पडून असल्याची माहिती आहे. विभागातील अशी महत्वाची पदे रिक्त पडलेली असून जिल्हा व नगर परिषद प्रशासनाचे कार्य किती सुरळीतपणे सुरू आहे याची प्रचिती येते.
अग्निशमन विभागाची ६७ पदांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 9:13 PM
आणीबाणीच्या स्थितीत महत्त्वाची भूमिका बजाविणाºया येथील अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. पदे रिक्त असल्यामुळे विभागाने आणखी ६७ पदांची मागणी केली असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
ठळक मुद्देविभागाला रिक्त पदांचे ग्रहण : शासनाकडे पाठविला सुधारित प्रस्ताव, रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण