शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
3
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
4
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
5
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
6
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
7
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
9
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
10
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:27 AM

आमगाव : रेल्वे स्टेशन ते लांजी रोड वाघ नदीपर्यंत रस्ता व नाली बांधकाम सुरू आहे. मात्र, नाली बांधकामात संबंधित ...

आमगाव : रेल्वे स्टेशन ते लांजी रोड वाघ नदीपर्यंत रस्ता व नाली बांधकाम सुरू आहे. मात्र, नाली बांधकामात संबंधित कंत्राटदार अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत आहे. यामुळे नालीवरील स्लॅबला भेगा पडल्या आहेत. या बाबींची दखल घेत व्यावसायिक व नागरिकांनी याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली तसेच हा प्रकार वृत्तपत्राच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणण्यात आला. वृत्त प्रकाशित होताच या संदर्भात प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत तहसीलदारांना निवेदन दिले.

शहरातील रस्ते, नाली बांधकाम शिवालय कन्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून केले जात आहे. कंत्राट कंपनीच्या वतीने हे काम करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केले आहेत. परंतु हे कंत्राटदार बांधकामाची वाट लावत आहेत, असा प्रकार रेल्वे स्टेशन ते लांजी रोड वाघ नदीपर्यंत रस्ता व नाली बांधकामादरम्यान सुरू आहे. रस्त्यालगतच नालीचे बांधकाम करून स्लॅब टाकण्यात आले. परंतु स्लॅबला भेगा पडल्या. यामुळे या कामात निकृष्ट साहित्याचा वापर केला जात असल्याचे चव्हाट्यावर आले. या संदर्भात व्यावसायिक व नागरिकांनी आक्षेप घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली. तसेच ही बाब वृत्तपत्राच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणली. बातमी प्रकाशित होताच या प्रकरणाची प्रहार संघटनेने दखल घेत तहसीलदारांना निवेदन दिले. रस्ता व नाली बांधकाम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असून, पूर्ण झालेल्या नालीला पाण्याची आवश्यकता असूनही पाणी दिले जात नाही. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून तातडीने नाली दुरुस्त करण्यात यावी. अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. शिष्टमंडळात प्रहार संघटना तालुकाप्रमुख सुमित गिरडकर, मनोज हत्तीमारे, नीलेश जांभुळकर, चंदू बडवाईक, गौरी गिरडकर, गिरीश लिल्हारे उपस्थित होते.