कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिव्यांचा मंद प्रकाश व आकाशदिव्यांचा लखलखाट याशिवाय दिवाळीचा सण साजराच होऊ शकत नाही. म्हणूनच सध्या गोंदियाकरांची या साहित्यांच्या खरेदीसाठी धावपळ सुरू आहे. रंगबिरंगी वेगवेगळ््या प्रकारच्या आकाशदिव्यांनी बाजारपेठ सजलेली दिसून येत आहेत. यात मात्र यंदा चायनीज आकाशदिव्यांची डिमांड घसरली असून भारतीय पारंपारीक आकाश दिव्यांना जास्त डिमांड असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.प्रकाशाच्या या सणात दिव्यांचा मान असून महालक्ष्मीच्या स्वागतासाठी घराच्या दारापासून अवघे घर प्रकाशमान केले जाते. यात दिव्यांच्या मंद प्रकाशाला आकाशदिव्यांच्या लखलखाटाची साथ महत्त्वाची असते. म्हणूनच दिवाळीच्या दिवशी नवीन दिवे लावण्याचा मान असतानाच त्याच्यासोबत आकाशदिवा हा हमखास लावला जातो. घराच्या समोर प्रकाश देणारा आकाशदिवा आता घरोघरी दिसून येणार आहे.नेमकी हीच बाब हेरून विक्रेते दरवर्षी आकाशदिव्यांच्या नवनवीन व्हेरायटी ग्राहकांसाठी घेऊन येतात. त्यानुसार यंदाही बाजारपेठ रंगबिरंगी वेगवेगळ््या प्रकारच्या आकाशदिव्यांनी सजलेली दिसून येत आहे.तर ग्राहकांची आतापासूनच खरेदीसाठी गर्दीही दिसून येत आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत चायनीज वस्तूंची चांगलीच चलती असताना आकाशदिव्यांनाही आता चायनीज ज्वर चढला होता. नागरिक स्वत: पुढाकार घेत आपल्याच पारंपारिक आकाशदिव्यांची मागणी करीत आहे. यामुळे चायनीज आकाशदिव्यांना मागणी घटत चालली आहे. बाजारातील विक्रेत्यांशी चर्चा केली असता त्यांनी, नागरिकांकडून यंदा भारतीय आकाशदिव्यांची मागणी केली जात आहे. त्यामुळे चायनीज आकाशदिवे अत्यंत कमी प्रमाणात विकले गेले. परिणामी आम्हीही भारतीय आकाशदिवेच जास्त प्रमाणात आणल्याचे सांगीतले. विशेष म्हणजे, कापडी दिवेही उपलब्ध असून ते पुन्हा वापरता येत असल्याने त्यांचीही मागणी आहे.२५-२५० रूपयांपर्यंतची रेंजसध्या बाजारात २५ रूपयांपासून २५० रूपयांपर्यंतच्या आकाशदिव्यांची रेंज दिसून येत आहे. यापेक्षाही जास्त दराचे आकाशदिवे विक्रीसाठी आहेत. मात्र ग्राहक जास्त महाग आकाशदिव्यांची खरेदी न करता मध्यम रेंजच्या दिव्यांना पसंती देत असल्याचे विक्रेते सांगतात. यातही आता आकाशदिव्यांत कापडांपासून तयार केलेले दिवे बाजारात आले आहेत.कापडांचे असल्याने त्यांना स्वच्छ करून नीट ठेवल्यास पुढील वर्षीही त्यांचा वापर करता येतो. त्यामुळे कागदांच्या आकाशदिव्यांऐवजी कापडांच्या आकाशदिव्यांची खरेदी ग्राहक जास्त करीत आहे.
भारतीय आकाशदिव्यांना डिमांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 5:00 AM
प्रकाशाच्या या सणात दिव्यांचा मान असून महालक्ष्मीच्या स्वागतासाठी घराच्या दारापासून अवघे घर प्रकाशमान केले जाते. यात दिव्यांच्या मंद प्रकाशाला आकाशदिव्यांच्या लखलखाटाची साथ महत्त्वाची असते. म्हणूनच दिवाळीच्या दिवशी नवीन दिवे लावण्याचा मान असतानाच त्याच्यासोबत आकाशदिवा हा हमखास लावला जातो. घराच्या समोर प्रकाश देणारा आकाशदिवा आता घरोघरी दिसून येणार आहे.
ठळक मुद्देरंगबिरंगी आकाशदिवे बाजारात : मध्यम रेंजला ग्राहकांची पसंती