ग्रामपंचायतीला विद्युत वितरण कंपनीने नोटीस बजावून केशोरी येथील सार्वजनिक पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस नागरिकांना अंधाराचा सामना करण्याची वेळ आली आहे. शासनाने ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून सार्वजनिक पथदिव्यांचा थकीत विद्युत बिल भरण्याची आदेशित केले आहे. परंतु सार्वजनिक पथदिव्यांच्या विद्युत देयक भरण्याची जवाबदारी संबंधित जिल्हा परिषद प्रशासनाची असल्यामुळे ग्रामपंचायतींना का भरावा असा प्रश्न निर्माण होतो. पंधराव्या वित्त आयोगाची ग्रामपंचायतींना प्राप्त झालेली निधी नियोजन करुन खर्ची घालण्यात आली आहे. शिल्लक रक्कम नसल्यामुळे सरपंच, उपसरपंच तालुका संघटनेनी शासनाला निवेदन देऊन सार्वजनिक पथदिव्यांचे विद्युत बिल ग्रामपंचायत प्रशासन भरणार नाही असे स्पष्ट केले आहे. तरीही यावर शासनाने निर्णय न घेतल्यामुळे केशोरीसह अनेक गावे अंधाराच्या सामना करीत आहेत. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून केशोरी येथील ग्रामपंचायच्यावतीने गावात सार्वजनिक सौर पथदिवे लावण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
........