रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा
गोरेगाव : शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून, त्यावर खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात त्यामुळे नागरिकांना रहदारीला फारच त्रास होतो. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी आहे.
वातावरणातील बदलामुळे भीती
तिरोडा : वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखी यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
बाजारातील रस्ते मोकळे करा
गोंदिया : बाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यातही दुकानदार त्यांच्या दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर आणून ठेवतात. नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यासाठी अडचण होते.
रस्त्यावरील झुडपे अपघाताला कारणीभूत
अर्जुनी-मोरगाव : राज्य मार्गालगत वाढलेली झुडपे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. वळणाच्या ठिकाणी असलेल्या या झुडपांमुळे वाहन दिसत नाही. झुडूप अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.
घाटावरून रेतीची तस्करी सुरूच
तिरोडा : तालुक्यातील घाटकुरोडा येथील रेती घाट क्रमांक १ चा अद्यापही लिलाव झालेला नाही, मात्र या घाटावर दररोज मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा सुरू आहे. परिणामी शासनाचा महसूृल बुडत आहे. त्यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी सरपंच प्रकाश भोंगाडे यांनी केली आहे. घाटकुरोडा येथील रेती घाट क्रमांक १ वरून रेती माफिया मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरने रेतीची तस्करी करत आहेत. परिणामी शासनाचा महसूलसुध्दा बुडत आहे. त्यामुळे स्वामित्वधनाची आकारणी करून शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत घाटकुरोडाला हा घाट देण्यात यावा, जेणेकरून शासनाला राजस्व प्राप्त होऊन रेती तस्करीला आळा घालण्यास मदत होईल, अशी मागणी सरपंच प्रकाश भोंगाडे यांनी केली आहे.
खतांचा अतिवापर धोकादायक
बोंडगावदेवी : चांगले पीक घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत आहेत. परंतु, अलीकडे या खतांचा अतिवापर होत आहे. त्यामुळे त्याचा मानवी जीवनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता अन्न प्रशासन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कोरोनामुळे विकासाची घडी विस्कटली
पांढरी : गावविकास करण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे स्रोत असलेले प्रमुख माध्यम मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती कर जमा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, मार्च महिन्यापासून आजपर्यंत नऊ महिन्यांचा कालावधी संपला असून, कराची रक्कम ग्रामपंचायतीला कोरोनाच्या प्रभावामुळे वसूल करता आली नाही. त्यामुळे गावविकासाची घडी विस्कटल्याचे चित्र आहे.
नेटवर्कअभावी नागरिक झाले त्रस्त
देवरी : विविध शासकीय कार्यालयांतील कामकाजासह खासगी कंपनी कार्यालयांतील कामे ऑनलाईन सुरू आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापरही वाढला आहे. मात्र, आता नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या गत आठ ते दहा वर्षांपासूनची आहे. यात दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
अधिकाऱ्यांकडून गावागावांत जनजागृती