रासायनिक भाज्यांमुळे आजारांत वाढ
सौंदड : शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे आजारांत वाढ झाली आहे.
खतांचा अतिवापर धोकादायक
नवेगावबांध : चांगले पीक घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत आहेत, परंतु अलीकडे या खतांचा अतिवापर होत आहे. त्यामुळे त्याचा मानवी जीवनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता अन्न प्रशासन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मोफत रेतीसाठी लाभार्थ्यांची पायपीट
परसवाडा : पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत आता पाच ब्रास रेती मोफत देण्यास मंजुरी दिली आहे. तहसीलदारांमार्फत रेतीचे वितरण केले जात असल्याने लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. तर, कर्मचारी त्यांची टोलवाटोलवी करीत असल्याने आता लाभार्थ्यांना पाटपीट करावी लागत आहे.
रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा
गोरेगाव : शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून, त्यावर खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे अजूनही बुजविलेले नाही.
बाजारातील रस्ते मोकळे करा
गोंदिया : बाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यातही दुकानदार त्यांच्या दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर आणून ठेवतात. नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यासाठी रस्ते अडचण होते.
कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी
सडक - अर्जुनी : मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ वर कोहमारा गाव आहे. मात्र, कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची कुठलीही सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
रस्त्यावरील झुडपे अपघाताला कारणीभूत
अर्जुनी-मोरगाव : राज्यमार्गालगत वाढलेली झुडपे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. वळणाच्या ठिकाणी असलेल्या या झुडपांमुळे वाहन दिसत नाही. ही झुडपे अपघातांना कारणीभूत ठरत आहे.
कार्यालयातून तक्रारपेट्या गायब
गोंदिया : शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. या हेतूने शासकीय कार्यालयांत तक्रारपेट्या लटकविलेल्या दिसायच्या.
वातावरणातील बदलामुळे भीती
अर्जुनी-मोरगाव : वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखीसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.