लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पोलीस पाटलांचे महत्त्व व त्यांच्या कामातील मेहनतीला सन्मान देत कॉँग्रेस सरकारने त्यांना मानधन लागू केले होते. मात्र भाजप सरकारच्या काळात त्यांची उपेक्षा होत आहे. पोलीस पाटलांच्या मागण्या योग्य असून त्यांच्या पूर्ततेसाठी आपल्या स्तरावर नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिले.महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या गोंदिया शाखेच्यावतीने आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार अग्रवाल देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळासोबत चर्चा करताना ते बोलत होते. या चर्चेत पोलीस पाटील संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार दरमहा सात हजार ५०० रूपये मानधन, पोलीस पाटलांना जीवन बिमा, सेवानिवृत्तीनंतर पेंशन लागू करणे किंवा ५ लाख रूपये निर्वाह भत्ता देणे, सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्ष करणे, पोलीस पाटलांच्या पदाचे वेळोवेळी नुतनीकरण न करता सेवानिवृत्ती पर्यंत कायम करणे, पोलीस पाटील नियुक्तीत अनुकंपा तत्व लागू करणे, पोलीस पाटलांना प्रशिक्षण, दैनिक प्रवास भत्ता व कार्यालय उपलब्ध करविणे आदि मागण्यांचे निवेदन देत त्यावर चर्चा केली.निवेदन देणाऱ्या प्रतिनिधीमंडळात संघटनेचे अध्यक्ष आनंद तुरकर, सचिव मनोहरसिंग चव्हाण, सहसचिव प्रवीण कोचे, जिल्हा सहसंघटक रविंद्र बिसेन, सचिव विनोद ठाकूर, सदस्य इंदूमती रहांगडाले, भृंगराज परशुरामकर, आशिष चव्हाण, बोरकर व अन्य पोलीस पाटील उपस्थित होते.
पोलीस पाटलांच्या मागण्या योग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 9:28 PM
पोलीस पाटलांचे महत्त्व व त्यांच्या कामातील मेहनतीला सन्मान देत कॉँग्रेस सरकारने त्यांना मानधन लागू केले होते. मात्र भाजप सरकारच्या काळात त्यांची उपेक्षा होत आहे. पोलीस पाटलांच्या मागण्या योग्य असून त्यांच्या पूर्ततेसाठी आपल्या स्तरावर नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिले.
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : पोलीस पाटील संघटनेने दिले मागण्यांचे निवेदन