लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : देशात असलेल्या लोकशाहीची वाटचाल सध्या हुकूमशाहीकडे सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. ते संविधान व लोकशाही संपविण्याचे काम केंद्रातील विद्यमान सरकार करीत आहे. आमची लढाई याविरुद्ध आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे प्रयत्न हाणून पाडावे, माझा लढा हा शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, वंचितांसाठी आहे. याची पहिली प्रेरणा मला सर्वप्रथम अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून अनुभवायला मिळाली. असे प्रतिपादन माजी खा. नाना पटोले यांनी येथे केले.मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटयार्डमध्ये आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन ते बोलत होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. अध्यक्ष टोलसिंहभाऊ पवार हे होते. यावेळी मंचावर माजी आ. रामरतन राऊत, नामदेव किरसान, अमर वऱ्हाडे, नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, भागवत नाकाडे, डॉ. बी.जी. भुतडा, अर्जुन नागपुरे, जगदीश मोहबंशी, राजेश नंदागवळी, होमराज कापगते, पं.स.च्या उपसभापती करुणा नांदगावे, विशाखा साखरे, आशा झिलपे, विलास गायकवाड, वंदना जांभुळकर, वंदना शहारे, जगदीश येरोला, मलेशाम येरोला, दीपक पवार, दिलीप डोये, विशाल शेंडे, अमृत टाक, खुमेंद्र मेंढे, रत्नदीप दहिवले, माणिक घनाडे, संतोष नरुले, डॉ. वालदे, योगेन्द्र सेठीया, आकाश कोरे उपस्थित होते.केंद्र शासनावर प्रहार करताना नाना पटोले यांनी नोटबंदी, काळेधन, महागाई, शेतकरी विरोधी धोरणावर आगपाखड केली. शासनाने कर्जमाफी जाहीर केली. माफी ही गुन्हेगारांना दिली जाते. आम्ही देशाचे पोशिंदे आहोत, गुन्हेगार नाही अशी टीका त्यांनी केली. संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. पटोले यांच्या काँग्रेस प्रवेशाने आम्हाला नवी चेतना, नवी उर्जा प्राप्त झाली आहे. मतभेद विसरुन कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन करुन कार्यकर्त्यांची ताकद नेत्यांसोबत असेल तर सत्ता परिवर्तन दूर नाही असे मत माजी आ.राऊत यांनी व्यक्त केले.शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशनाना पटोले व काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून विजय राठोड, राकेश शुक्ला, कमल जायस्वाल, परेश उजवणे, रमेश भाग्यवंत, देवाजी कापगते, राजू पालीवाल (भाजप), हेमंत भांडारकर, शिला पटले (रॉका), तसेच आनंदकुमार जांभुळकर, यमू ब्राम्हणकर, शिला उईके, नाशिक शहारे, संजय नाकाडे यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.
लोकशाहीची वाटचाल हुकूूमशाहीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:44 PM
देशात असलेल्या लोकशाहीची वाटचाल सध्या हुकूमशाहीकडे सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. ते संविधान व लोकशाही संपविण्याचे काम केंद्रातील विद्यमान सरकार करीत आहे.
ठळक मुद्दे नाना पटोले : अर्जुनी मोरगाव येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा