शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
3
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
4
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
8
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
9
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
10
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
11
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
13
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
14
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
15
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
16
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
17
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
18
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
19
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
20
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!

राष्ट्रवादीचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 9:53 PM

पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढी विरोधात बुधवारी (दि.३) येथील तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी धरणे आंदोलन केले. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार धनंजय देशमुख यांना देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढी विरोधात बुधवारी (दि.३) येथील तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी धरणे आंदोलन केले. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार धनंजय देशमुख यांना देण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते गंगाधर परशुरामकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य मनोहर चंद्रिकापुरे, तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, माजी अध्यक्ष नारायण भेंडारकर, नामदेव डोंगरवार, जि.प.सदस्य किशोर तरोणे, राकेश लंजे, चित्रलेखा मिश्रा, सुशिला हलमारे, गोवर्धन ताराम, दादा संग्रामे, सोनदास गणवीर, यशवंत गणवीर, आर.के.जांभुळकर, भोजराम रहेले, मनोहर शहारे, दीपक रहेले, अजय पाऊलझगडे, भाऊराव खोब्रागडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.पेट्रोल, डिझेल गॅसची दैनंदिन होणारी दरवाढ बंद करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शिष्यवृत्ती त्वरीत देण्यात यावी, कीडनाशकामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करावे, झाशीनगर उपसा सिंचन योजना त्वरीत सुरु करावी, जि.प.शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्या, रोहयोयोजनेच्या कुशल कामाचा निधी त्वरीत द्यावा, शेतकऱ्यांचे शेतीचे विद्युत बिल सरसकट माफ करावे, नवीन राशन कार्ड द्यावे, वनजमीन व घराचे पट्टे त्वरीत द्यावे व गॅसधारकांना केरोसीन उपलब्ध करुन द्यावा या मागण्यांचा समावेश आहे.केंद्र वर राज्य सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शासनाने शेतकऱ्यांना कर्जाफी दिली मात्र अद्यापही अनेक शेतकºयांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. जय जवान-जय किसानचा नारा देणारे लाल बहादूर शास्री व महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी शेतकऱ्यांच्या मोर्च्यावर अश्रूधुराचा वापर केला जातो. यावरुन सरकारचा शेतकऱ्यांविषयीचा कळवळा दिसून येतो.शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे काम अद्याप पूर्णत्वास येऊ नये यावरुन याची प्रचिती येते. यासाठी लवकरच आपण झाशीनगर येथून संघर्ष यात्रेचे आयोजन करणार असल्याचे मत मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले. जि.प.चे गट नेते गंगाधर परशुरामकर यांनी भाजप सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचा दाखला देताना म्हणाले, यापुढे शेतकऱ्यांना आपल्या शेतात कोणते पिक घ्यायचे आहे, विंधन विहिरीचे खोदकाम करावयाचे आहे, यासाठी प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागेल. त्यावर ५ टक्के कर भरणा करावा लागेल. शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरणारा भूजल अधिनियम येणार आहे. गोंदिया जिल्ह्यात स्क्रब टायफस व साथीच्या आजाराचे थैमान असताना ५५ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. हॉपकीन नावाची लस तयार करणारी कंपनी आहे. शासनाने या कंपणीला औषधी पुरवठयाचे कंत्राट दिले. मात्र कंपनीने दोन वर्षात औषधांचा पुरवठा केलाच नाही.शेवटी शासकीय दर कराराप्रमाणे औषधांची खरेदी करण्याचे शासनाने अधिकार दिले. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. एकंदरीत शासनाच्या या सर्व चुकीच्या धोरणामुळे शेतकरी उध्दवस्त झाला असल्याचे सांगितले. या धरणे आंदोलनाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, संचालन गोवर्धन ताराम यांनी केले. योगेश नाकाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPetrolपेट्रोल