शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

मलेरियाला मागे टाकून डेंग्यू फोफावला; सप्टेंबर महिन्यात ७१ रुग्ण

By कपिल केकत | Published: October 06, 2023 8:19 PM

सुदैवाने जिल्ह्यात मृत्यू नाही

कपिल केकत गोंदिया : जिल्ह्यात मलेरियाचे रुग्ण आढळून आले व त्यातच दोघांचा जीव गेल्याने मलेरियापासून जास्त धोका दिसून येत होता. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, मलेरियापेक्षा डेंग्यू फोफावताना दिसत आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात जेथे मलेरियाचे रुग्ण जास्त होते, तेथेच सप्टेंबर महिन्यात मात्र डेंग्यूने पाय पसरले असून, ७१ रुग्ण आढळून आले आहेत. सुदैवाने जिल्ह्यात आतापर्यंत डेंग्यूमुळे एकाही मृत्यूची नोंद घेण्यात आलेली नाही.

पावसाळ्यात प्रामुख्याने आजारांचे प्रमाण वाढते. यामध्ये जलजन्य आजार असो की, तापाच्या साोसोबतच डासजन्य आजारांचे प्रमाण जरा जास्तच असते. यंदा तर आजारांनी एकामागून एक रांगच लावली आहे. डोळे येण्यापासून याची सुरुवात झाली असून, त्यानंतर मलेरिया रुग्ण वाढले होते. हे सुरू असतानाच ताप व टायफॉइडची साथ जिल्ह्यात अद्याप सुरूच आहे, तर त्यातच आता डेंग्यूने टेन्शन वाढविले आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यात मलेरियाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून आले असून, यामुळे दोघांचा जीव गेल्याचीही नोंद आहे. यामुळे सुरुवातीला डेंग्यूपासून धोका दिसून येत नव्हता.

मात्र, मलेरियासोबतच डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले असतानाच सप्टेंबर महिन्यात मलेरियाला मागे टाकून डेंग्यू पुढे निघून गेला आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात मलेरियाचे फक्त २३ रुग्ण आढळून आले असतानाच डेंग्यूचे तब्बल ७१ रुग्ण आढळून आले आहेत. यावरून आता मलेरियाला मागे टाकून डेंग्यू फोफावताना दिसत आहे. मलेरिया व डेंग्यूची ही आकडेवारी बघता जिल्ह्यात डासांचा किती मोठ्या प्रमाणात उद्रेक सुरू आहे याची प्रचीती येते, तर सोबतच यावर जिल्हा प्रशासन तोडगा काढण्यात हतबल आहे, याचीही प्रचीती येते.

गोंदिया तालुक्यालाच ग्रहण

- आतापर्यंत डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण गोंदिया शहर व तालुक्यातच आढळून आले आहेत. यात जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत गोंदिया तालुक्यात २३, तर फक्त शहरात १० रुग्ण आढळून आले आहेत. आता सप्टेंबर महिन्यात तालुक्यात १५ रुग्ण आढळून आले असून, शहरात ८ रुग्ण आढळून आले आहेत. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण १५० रुग्ण डेंग्यूचे आढळून आले आहेत.

तापाची साथ त्यात डेंग्यूचे टेन्शन

- जिल्ह्यात सध्या ताप व त्यातच टायफॉइडची साथ पसरली आहे. घराघरांत ताप व टायफॉइडचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे अगोदरच जिल्हावासी चिंताग्रस्त आहेत. अशात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळेच मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येत वाढले आहेत. डेंग्यू आता जिल्हावासीयांसाठी टेन्शन बनला आहे.

जानेवारी ते ऑगस्ट रुग्णसंख्या

गोंदिया - २३

तिरोडा - ०२आमगाव - ०९

गोरेगाव - ०९देवरी - ०२

सडक-अर्जुनी - १३सालेकसा - ०५

अर्जुनी-मोरगाव - ०६गोंदिया शहर - १०

तिरोडा शहर - ००एकूण - ७९

सप्टेंबर महिन्यातील रुग्णसंख्या

गोंदिया - १५तिरोडा - ०६

आमगाव - ०४गोरेगाव - १४

देवरी - ०३सडक-अर्जुनी - ०६

सालेकसा - ०६अर्जुनी-मोरगाव - ०८

गोंदिया शहर - ०८तिरोडा शहर - ०१

एकूण - ७१

टॅग्स :dengueडेंग्यू