शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

डेंग्यूने मेंडकीत युवकाचा मृत्यू

By admin | Published: August 27, 2014 11:40 PM

डेंग्यू आजाराने मेंडकी/बकी येथील ज्ञानेश्वर लाकडू लाळे (३५) या तरुणाचा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात तडकाफडकी मृत्यू झाल्याने गावात व परिसरातही दहशत पसरली आहे.

चिखली : डेंग्यू आजाराने मेंडकी/बकी येथील ज्ञानेश्वर लाकडू लाळे (३५) या तरुणाचा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात तडकाफडकी मृत्यू झाल्याने गावात व परिसरातही दहशत पसरली आहे.ज्ञानेश्वर याला मागील आठ दिवसांपासून ताप येत होता. त्यास खासगी डॉक्टरकडे दाखविण्यात आले. मात्र तब्येत जास्त बिघडल्याने त्यास साकोली येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. सदर डॉक्टरनेही प्राथमिक उपचार करुन नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नागपूर येथे भरती केले असता उपचारादरम्यान बुधवारी (दि.२७) सकाळी ६ वाजतादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रुग्णाच्या नातेवाईकांनी मृत्यूचे कारण विचारले असता डॉक्टरांनी डेंग्यू आजार असल्याचे सांगितले.डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची बातमी गावात येऊन धडकताच गावात दहशत पसरली आहे. चिखली येथील आयुर्वेदिक दवाखाना बंद करुन या परिसरातील गावे खोडशिवणी या २० ते २५ कि.मी. दूर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडल्याने या भागातील आरोग्य व्यवस्था पार कोलमडून पडली आहे. एक महिन्याअगोदर जवळील पिपरी गावात डेंग्यू आजाराचा उद्रेक झाला होता. तर कोहळीटोला येथेही डेंगूचा रुग्ण आढळला होता. सद्यस्थितीत बकी, मेंडकी, चिखली, कोहळीटोला परिसरात तापाची साथ पसरल्याने व जलजन्य, कीटकजन्य आजाराची लागण झाल्याने संपूर्ण परिसरात फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)