शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कृषी विभाग ॲक्शन मोडवर, पाच कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 5:00 AM

ऑफलाइन पद्धतीने विक्री केल्यामुळे जिल्ह्यात खताची उपलब्धता असल्याबाबत चुकीची माहिती खत प्रणालीवर दिसते. त्यामुळे जिल्ह्यास रासायनिक खताचा कमी पुरवठा होऊन टंचाईची परिस्थिती निर्माण होते. जिल्ह्यातील काही विक्रेत्यांनी ऑफलाइन पद्धतीने रासायनिक खताची मोठ्या प्रमाणात विक्री केल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना नोटीस देऊन खुलासा मागितला. त्यांनी दिलेले खुलासे समाधानकारक नसल्यामुळे त्यांचे रासायनिक खत विक्री परवाने ६ महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात खताचा पुरवठा केल्यानंतरही काही विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करून, अधिक दराने खताची विक्री करीत होते. ‘लोकमत’ने हा मुद्दा लावून धरल्यानंतर कृषी विभागाने याची दखल घेत, पॉस प्रणालीवर विक्री न करता ऑफलाइन खताची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील पाच कृषी केंद्राचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे.सहा महिन्यांसाठी परवाने निलंबित केलेल्यांमध्ये मे.कास्तकार कृषी केंद्र नवेगाव धापेवाडा, मे.गुगल ट्रेडर्स परसवाडा, मे.हिमालय ॲग्रो इंटरप्रायजेस गोरेगाव, मे.शेतकरी कृषी केंद्र सडक अर्जुनी, मे.तिरुपती कृषी सेवा केंद्र डव्वा या कृषी केंद्राचा समावेश आहे. रासायनिक खत विक्री करताना ती ऑनलाइन पद्धतीने पॉस प्रणालीवर (पीओएस) करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार, कृषी विभागामार्फत विक्रेत्यांना वेळोवेळी सूचना दिल्या. ऑफलाइन पद्धतीने विक्री केल्यामुळे जिल्ह्यात खताची उपलब्धता असल्याबाबत चुकीची माहिती खत प्रणालीवर दिसते. त्यामुळे जिल्ह्यास रासायनिक खताचा कमी पुरवठा होऊन टंचाईची परिस्थिती निर्माण होते. जिल्ह्यातील काही विक्रेत्यांनी ऑफलाइन पद्धतीने रासायनिक खताची मोठ्या प्रमाणात विक्री केल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना नोटीस देऊन खुलासा मागितला. त्यांनी दिलेले खुलासे समाधानकारक नसल्यामुळे त्यांचे रासायनिक खत विक्री परवाने ६ महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. 

सीमेवरील खत विक्रेत्यांची चौकशी सुरू- महाराष्ट्रातील युरिया खताची लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात अधिक दराने विक्री करणाऱ्या आमगाव, सालेकसा, देवरी या तिन्ही तालुक्यांतील काही खत विक्रेत्यांची कृषी विभागाने चौकशी सुरू केली आहे. स्टॉक बुकनुसार स्टॉक आहे किंवा याचीही चाचपणी सुरू केल्याची माहिती आहे. 

लिंकिंगचा भुर्दंड शेतकऱ्यांना- काही खत विक्रेत्या कंपन्या वितरकांना युरियाचा पुरवठा करताना, त्यासोबत संयुक्त खते घेण्याची सक्ती करीत आहेत. यामुळे कृषी केंद्र संचालक ते शेतकऱ्यांच्या माथी मारत आहे. २६८ रुपयांची युरियाची बॅग खरेदी करण्यासाठी १,१५० रुपयांची संयुक्त खताची खरेदी करावी लागत आहे. 

जिल्ह्यातील खत विक्रेत्यांंनी रासायनिक खताची विक्री केवळ ऑनलाइन पद्धतीने पॉस प्रणालीवर करावी. खताची साठेबाजी, काळाबाजार, लिंकिंग इत्यादी गैरव्यवहार निदर्शनास आल्यास संबंधित कृषी केंद्रावर कडक कारवाई करण्यात येईल.- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

 

टॅग्स :agricultureशेती