पाणीसाठा वाढेल : लोकसहभागातून गाळ काढण्याला सुरुवात लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : पतंगी तलावात गाळ साचल्याने पाण्याचा साठा कमी असतो तो गाळ काढून झाल्यावर पाण्याचा साठा वाढेल, जणावरांना पिण्याची सोय होईल. परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी वाढेल तसेच हा गाळ शेतात टाकल्याने शेतीची सुपिकता वाढून पिके भरघोष घेता येतील, असे मत वडेगावच्य सरपंच तुमेश्वरी बघेले यांनी लोकसहभागातून तलावाचे खोलीकरण कार्यक्रमात त्यांनी व्यक्त केले.या वेळी जिल्हा परिषद सदस्या सुनिता मडावी, पं.स. सदस्या निता रहांगडाले, नायब तहसीलदार आर.डी. पटले, ग्राम विकास अधिकारी व्ही.बी. सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य लिलाधर बिसेन, सुनील टेंभरे, चंदा शर्मा, ममता ठाकरे, पोलीस पाटील मुन्ना सोनवाने, विजय असाटी, तंटामुक्ती अध्यक्ष विनायक बडगे, मारूती चावके, लोकेश मिश्रा, तलाठी नरेश उगवकर प्रामुख्याने उपस्थित होते. गाळ काढण्याच्या कामात जेसीबीने खोलीकरण व ट्रॅक्टरने शेतात नेवून टाकणे, १०० रुपये प्रत्येक ट्रॅक्टर व जेसीपी असे २०० रुपये फक्त प्रत्येक ट्रिपमागे लागणार आहेत. त्यामुळे माती टाकणाऱ्या शेतकऱ्यांची रिघ लागली आहे. हे सर्व काम शासनाकडून एकही रुपया न घेता लोकसहभागातून होत आहे. संचालन लोकेश मिश्रा यांनी केले. आभार सचिव व्ही.बी. सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमासाठी उपसरपंच सुधीर मेश्राम, ग्रा.पं. सदस्य राजेश कावळे, प्रतिष्ठित नागरिक व गावकऱ्यांनी सहकार्य केले.
पतंगी तलावाचे खोलीकरण
By admin | Published: May 26, 2017 12:40 AM