रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता
गोरेगाव : शहरातील उपमुख्य रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यांमध्ये भरण घालण्यात आले असले तरी ते साहित्य रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होत आहेत.
विडी उद्योगांवर उतरती कळा
गोंदिया : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात एकेकाळी मोठ्या उद्योगांना आव्हान देणाऱ्या विडी उद्योगाला उतरती कळा लागली आहे. यामुळे हजारो कामगारांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.
उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता
गोंदिया : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे वाहने बाहेर काढणे कठीण होत आहे.
वडेगाव मार्गावर खडीकरणाची मागणी
सडक अर्जुनी : तालुक्यातील केसलवाडा-वडेगाव मार्गावर मागील पाच वर्षांपासून खडीकरण न झाल्याने नागरिकांना ये -जा करण्यासाठी फारच त्रास सहन करावा लागत आहे.
अर्धवट बांधकामाचा बसतोय फटका
गोरेगाव : गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावर फाटक नसलेल्या ठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे़. अपुऱ्या मनुष्यबळ अभावी रेल्वेमार्गावर फाटक उभारण्यास अडचणी होत आहे.
रेती साठ्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील रेतीघाट परिसरात व शहरातील चंद्रभागा नाका, चुरडी, शाल्व्हीन बार मागे, अन्य ठिकाणी शहरात रेतीचा मोठा साठा पडला असतो.
ग्रामीण भागात पाणी गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
भंडारा : ग्रामीण भागात नळयोजनाद्वारे वितरीत होणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक गावांत नळयोजना असली तरी जलशुद्धीकरणाची योजना नाही. त्यामुळे नदीचे अथवा विहिरीचे थेट पाणी प्यावे लागते.
नाल्यावरील पुलाची उंची वाढवा
सोनपुरी : सोनपुरी ते बोदरा साकोली मार्गावरील सोनपुरी मारबद नाल्यावरील पुलाची उंची खूपच कमी आहे. सदर मार्गावर पावसाळ्यामध्ये सतत पाणी राहत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असते. परिणामी या पुलाचे बांधकाम आतापासून करण्याची गरज आहे.
कोरोनामुळे विकासाची घडी विस्कटली
पांढरी : गावविकास करण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे स्त्रोत असलेले प्रमुख माध्यम मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती कर जमा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, मार्च महिन्यापासून आजपर्यंत ९ महिन्यांचा कालावधी संपला असून, कराची रक्कम ग्रामपंचायतीला कोरोनाच्या प्रभावामुळे वसूल करता आली नाही. त्यामुळे गावविकासाची घडी विस्कटल्याचे चित्र आहे.
नेटवर्कअभावी नागरिक झाले त्रस्त
देवरी : विविध शासकीय कार्यालयांतील कामकाजांसह खासगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाईन सुरू आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापरही वाढला आहे. मात्र, आता नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या गत आठ ते दहा वर्षांपासूनची आहे. दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
रासायनिक भाज्यांमुळे आजारात वाढ
सौंदड : शेतकरी रासायनिक खाताचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे आजारांत वाढ झाली आहे.
रस्त्यावरील झुडपे अपघाताला कारणीभूत
अर्जुनी-मोरगाव : राज्य मार्गालगत वाढलेली झुडपे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. वळणाच्या ठिकाणी असलेल्या या झुडपांमुळे वाहन दिसत नाही. हे झुडुप अपघातांना कारणीभूत ठरत आहे.
बाजारातील रस्ते मोकळे करा
गोंदिया : बाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यातही दुकानदार त्यांच्या दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर आणून ठेवतात. नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यासाठी रस्ते अडचण होते.
वातावरणातील बदलामुळे भीती
अर्जुनी-मोरगाव : वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखीसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी
सडक - अर्जुनी : मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ६ वर कोहमारा गाव आहे. मात्र कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची कुठलीही सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
स्त्यावर पडलेले खड्डे बुजवा
गोरेगाव : शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून, त्यावर खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात त्यामुळे नागरिकांना रहदारीला फारच त्रास होतो. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी आहे.