शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

औषधोपचारापासून गरीब बालके वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 9:55 PM

गोरगरीब रुग्ण औषाधोपचारापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. आता या योजनेचे नाव बदलून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे बीजीडब्ल्यू रुग्णालयातील प्रकार : कमी मनुष्यबळाचा फटका

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरगरीब रुग्ण औषाधोपचारापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. आता या योजनेचे नाव बदलून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना करण्यात आले आहे. मात्र या योजनेचा लाभ मागील महिनाभरापासून गरीब बालक व महिलांना मिळत नसल्याने त्यांना औषधोपचारापासूृन वंचित राहण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यातील एकमेव महिला व बाल रुग्णालय असलेल्या बाई गंगाबाई महिला रूग्णालयात (बीजीडब्ल्यू) मागील महिनाभरापासून महिला व बालकांना या योजनेतंर्गत उपचार मिळत नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावे लागत आहे. याचा आर्थिक भुर्दंड बसत असल्याने गोरगरीब रुग्ण अडचणीत आले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच येथील महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या एमसीओ डॉ. जयंती पटले अनुपस्थित आहेत. मे महिना लागूनही त्या कामावर रूजू झाल्या नाहीत. त्यामुळे रूग्णालयात दाखल बालकांचे सदर योजनेंतर्गत एनरोलमेंट होत नाही. त्यामुळे ही बालके औषधोपचारापासून वंचित असल्याची रूग्णांची ओरड आहे. विशेष म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत रूग्णालयात दाखल बालकांचे एनरोलमेंट केले जाते. त्यानंतर त्यांच्यावर नि:शुल्क औषधोपचार केला जातो. मात्र एनरोलमेंट करून घेणारे संबंधित अधिकारीच सातत्याने अनुपस्थित असल्यामुळे बालकांना औषध मिळत नसल्याचे त्यांच्या पालकांनी सांगितले आहे. गंगाबाई रूग्णालयातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या केंद्रात संबंधित कर्मचाऱ्यांसाठी थम इंप्रेशन मशीन लागलेली आहे. मात्र त्यानुसार कर्मचाºयांचे वेतन निघत नसल्यामुळे कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची माहिती आहे.वरिष्ठ अधिकारीसुद्धा त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याची रूग्णांची ओरड आहे. याकडे जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.वर्षभरात ३१७ प्रकरणेमहात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या आर्थिक वर्षात एकूण ३१७ शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले. त्यावर ५२ लाख ९२ हजार रूपयांचा खर्च झाला. यात प्रसूती शस्त्रक्रिया १६२ असून त्यावर १९ लाख ४४ हजार रूपयांचा खर्च झालेला आहे. तर बालकांच्या औषधोपचाराची एकूण १५५ प्रकरणे असून त्यासाठी ३३ लाख ४८ हजार रूपयांचा खर्च झाला आहे.एप्रिल २०१८ मध्ये शून्य लाभार्थीएप्रिल २०१८ मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत एकाही लाभार्थ्याला लाभ मिळालेला नाही किंवा अत्यल्प प्रकरणे असावेत, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एप्रिल व मे महिन्यात दरवर्षी हीच स्थिती असल्याची माहिती आहे.वर्षभरापासून सिकलसेल मशीन बंदयेथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात सिकलसेल तपासणीसाठी एक मशीन लावण्यात आली. मात्र मागील वर्षभरापासून ही मशिन बंद पडून आहे. ही मशिन सुरू करण्यासाठी संबंधित कंपनीच्या अभियंत्याला बोलविण्यात आले होते. मात्र त्यांनी या मशिनमध्ये टाकण्यात येणार ओरीजनल पावडर उपलब्ध होत नाही. तोपर्यंत मशिन सुरू होणार नसल्याचे अधिष्ठाता यांना सांगितले. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही पावडर बोलविण्यात न आल्याने ही मशिन बंद पडून आहे. याचा फटका रुग्णांना बसत आहे.सीबीसी मशिनचे तेच हालसिकसेल तपासणी मशिनसह सीबीसी तपासणी मशिन सुध्दा नादुरुस्त असल्याने गोरगरीब रुग्णांना खासगी रूग्णालयात जावून दोनशे रुपये मोजून सीबीसी तपासणी करुन घ्यावी लागत आहे. मात्र याकडे रुग्णालय प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल