गोंदिया नगर परिषदेकडे मनुष्यबळ व कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा नाही. मात्र तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव बघता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुख्याधिकाऱ्यांनी अगोदरच निर्देश दिले आहेत. शिवाय कोविड केअर सेंटरमधील अन्नपदार्थांचा कचऱ्याबाबतही त्यांनी आरोग्य विभागाला सांगितले आहे. म्हणूनच कचरागाडी कोविड केअर सेंटरमधील कचरा घेत नाही, तर मास्क आढळून आल्यास त्याला नियमानुसार नष्ट केले जात आहे.
-------------------------------------
रुग्णालयातील कचऱ्यासाठी विशेष कंत्राट
रुग्णालयातून निघणाऱ्या बायो मेडिकल वेस्टसाठी नागपूर येथील कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. कंपनीची गाडी येते व ती संपूर्ण कचरा उचलून नेते व त्यांच्या प्लांटमध्ये नियमानुसार त्याला नष्ट केले जाते. त्यातच आता रुग्णांचे शिळे जेवण व किंवा अन्य ओल व सुका कचऱ्यासाठीही कंपनीलाच सांगितले आहे. रुग्णालयातील संपूर्ण कचरा आता कंपनीच नेत असून, त्याची विल्हेवाट लावली जात आहे.
----------------------------
मास्क मिळाल्यास केले जाते नष्ट
रुग्णांच्या कचऱ्यासाठी विशेष कंत्राट देण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही कुणा व्यक्तींकडून कचऱ्यात मास्क टाकले गेले असता त्याला सुरक्षितरीत्या वेगळे करून नष्ट केले जाते. नगर परिषदेने यासाठी कचरा वेगळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व आरोग्य विभागाला तसे आदेश दिले आहेत.
--------------------------------
नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज
नागरिकांनी त्यांच्याकडील वापरलेले मास्क इतरत्र फेकता त्यांना सोडियम हायपोफ्लोराइडमध्ये ३० मिनिटे बुडवून निर्जंतुक करावे. तसेच मास्क खराब झालेले असल्यास त्याला जाळून नष्ट करावे. आपली सुरक्षा आपल्या हातात असून, यातूनच कोरोनापासून बचाव व कोरोनाला पछाडता येणार आहे.
- करण चव्हाण
मुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया
---------------------------------------------
- शहरात रोज निघणारा कचरा-६५ टन
- २६.३ टन ओला कचरा
- २७.३१ टन सुका कचरा