शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

शहराला लागलेला घाणीचा विळखा सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:12 PM

शहरातील कचºयाच्या समस्येवर तोडगा निघण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. कारण, शहरात बघावे तेथे कचºयाचे ढीग लागलेले दिसून येत आहेत.

ठळक मुद्देबघावे तेथे कचºयाचे ढीग : डासांचा प्रकोप वाढला, दुर्गंधीने शहरवासी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील कचºयाच्या समस्येवर तोडगा निघण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. कारण, शहरात बघावे तेथे कचºयाचे ढीग लागलेले दिसून येत आहेत. मान्सून पुर्व सफाईचाही काहीच फायदा जाणवत नसून नाल्यांची स्थिती होती तीच आहे. परिणामी शहराला लागलेला कचºयाचा विळखा सुटत नसल्याचे दिसत आहे.पावसाळा हा आजारांचा काळ असतो. जलजन्य व संसर्गजन्य आजार या काळात झपाट्याने पसरतात. परिणामी पावसाळ््यात पाहिजे तेवढी स्वच्छता व त्यासोबतच सावधानी बाळगण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. त्यानुसार नागरिक आपल्या घरातील स्वच्छेवर जोर देऊन ती पाळू शकतो. मात्र शहरातील वातावरणावर कुणाचा जोर चालत नाही. परिणामी त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोच. यासाठीच नगर परिषदेकडून पावसाळ््यापूर्वी स्वच्छता अभियान राबविले जाते. मात्र यंदाचे अभियान सपशेल फेल ठरल्याचे दिसले. नाल्यांची जी स्थिती होती तीच स्थिती पावसाळ््यात बघावयास मिळाली व आजही तीच स्थिती आहे.शिवाय शहरात बघावे तेथे कचºयांचे ढिगार लागून असलेले दिसत आहेत. आज शहरातील प्रत्येकच भागात घाणीचे ढिगार दिसून येत आहेत. यातून शहरवासीयांचे आरोग्य कितपत सुरक्षीत आहे याची प्रचिती येते. शिवाय नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाची कर्तव्यतत्परता सुद्धा यातून नजरेत येते. घाणीचे ढिगार, सांडपाण्याने तुंबलेल्या नाल्या या सर्व प्रकारांमुळे शहरात एकतर नाक दाबून वावरावे लागत आहे. तसेच डासांचा प्रकोप वाढल्याने डेंग्यू व मलेरिया सारख्या आजारांच्या दहशतीत शहरवासी आपले दिवस घालवत आहेत.आता दिवाळी झाली शहरवासीयांच्या घरातील कचरा रस्त्यांवर आला. परिणामी शहरात जागोजागी कचºयाचे ढिगार लागले. दिवाळीच्या सुट्यांमुळे सफाई कर्मचारीही सुटीवर होते. आता दिवाळी सरली असली तरिही शहरात कचºयाच्या ढिगारांचे चित्र आहे तेच आहे. नगर परिषद मात्र उघड्या डोळ््याने हा प्रकार बघत असल्याने शहरवासीयांत रोष खदखदत आहे.यंत्रणा ठरतेय कुचकामीनगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडे २७१ स्थायी सफाई कर्मचारी व १८ रोजंदारी कर्मचारी आजघडीला कार्यरत आहेत. तसेच निघालेल्या कचºयाची उचल करण्यासाठी नगर परिषदेचे पाच तर भाड्याने घेतलेले आठ ट्रॅक्टर आहेत. यातील एक ट्रॅक्टर बाजार भागासाठी असून दिवसातून तीन ट्रीप मारतो. ११ ट्रॅक्टर शहरातील प्रभागांत जातात. तर एक ट्रॅक्टर इमरजंसी सेवेसाठी असतो. एवढा सर्व ताफा असतानाही शहरातील स्थिती बघता हे सर्व काही कुचकामी ठरत असल्याचेच दिसून पडते. कारण एवढे मनुष्यबळ व वाहने असतानाही शहर बकाल झाले आहे.मान्सूनपूर्व सफाई अभियान फेलपावसाळा सुरू होण्यापूर्वी नगर परिषदेकडून कचरा व नाल्यांची सफाई करण्यासाठी मान्सूनपूर्व सफाई अभियान राबविले जाते. विशेष म्हणजे यासाठी काही कर्मचारी व वाहन कंत्राटी तत्वावर घेतले जातात. या अभियानांतर्गत शहरातील मोठे नाले, अंतर्गत लहान नाल्यांची सफाई, त्यातील गाळ काढून बंद पडलेल्या नाल्या मोकळ््या करणे आदी कामे केली जातात. मात्र शहरातील कित्येक नाल्यांची सफाईच झालेली नसून त्या चोक पडून असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यातून मान्सूनपूर्व सफाई अभियान फेल ठरल्याचेच दिसते.दुर्गंध व डासांचा प्रकोपसफाई व्यवस्था कुचकामी ठरत असल्याने जागोजागी कचºयाचे ढिग लागले असून या ढिगांतून दुर्गंध पसरत आहे. परिणामी शहरवासीयांचा श्वास कोंडत असून त्यांना नाक दाबून वावरावे लागत आहे. शिवाय शहरात डासांचा प्रकोप वाढला आहे. रात्री तर रात्री मात्र दिवसाही डासांमुळे शहरवासी हैरान झाले आहेत. अशात नगर परिषदेकडे फवारणीसाठी औषध नसल्याचेही दिसले. यातून पालिकेचा कारभार किती सुरळीतपणे चालत आहे याची प्रचिती येते.