लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात जेव्हा जेव्हा भाजपाचा खासदार निवडून आला. तेव्हा तेव्हा या भागाचा विकास होण्याऐवजी अधोगती झाली आहे. मागील चार वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्यात एकही मोठा उद्योग आला नसून एकही सिंचन प्रकल्प मार्गी लागला नाही. गोंदिया-भंडारा जिल्हाचा सर्वांगिण विकास केवळ खा.प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात झाला. त्यांच्याच कार्यकाळात अदानी विद्युत प्रकल्प, बिरसी विमानतळाचे आधुनिकीकरण, भेल प्रकल्प व अनेक नवीन रेल्वे गाड्यांना गोंदिया येथे थांबा मिळाला. या क्षेत्राच्या विकास करण्याची आणि मोठे प्रकल्प खेचून आणण्याची क्षमता केवळ प्रफुल्ल पटेल यांच्यात असल्याचे मत माजी आ.राजेंद्र जैन यांनी व्यक्त केले.राष्टÑवादी काँग्रेस बुथ कमिटीची बैठक रविवारी (दि.२७) शहरातील रामनगर येथे पार पडली. या वेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या वेळी विजय शाहू, अब्दुल गफार, नजीर तिगाला, विष्णू शर्मा, इदरीसभाई, सलीमभाई, आर.व्ही.पोचलवार, शमीम कुरैशी, वामन गेडाम, मिर्झा नबीबेग, कदीर खान, आरीफ शेख, मकसुद अली, इस्माईल शेख, शेख इस्तेपाक, अमित बोरकर, पिंटू डोंगरे, आबीद मुकीफ, टिकू चव्हाण, वासुदेव ढेंगे, शेख मोहम्मद, महेंद्र नायडू, इरफान शेख, सुनील उमरे, एस.एच.पोरचेट्टीवार, नईम कुरैशी, किरीट जेटवा उपस्थित होते. जैन म्हणाले, केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी जनतेला मोठी मोठी आश्वासने दिली होती. दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार व शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तत: केली नाही. उलट मागील चार वर्षांत बेरोजगारीत वाढ झाली असून शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यात पंधरा हजार शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा सर्वांगिन विकास केवळ प्रफुल्ल पटेल यांच्याच नेतृत्त्वात शक्य असून यासाठी दोन्ही जिल्ह्यातील जनतेने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले. अशोक सहारे यांनी बुथ कमिटी सदस्यांनी प्रत्येक बुथ बळकट करुन पटेल यांचा विजयाचा मार्ग मोकळा करण्याचे आवाहन केले. विनोद हरिणखेडे म्हणाले बुथ कमिट्या या कार्यकर्त्यांच्या एकतेचे प्रतीक असून यांची निवडणुकीच्या कालावधीत महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले. शिव शर्मा यांनी विद्यमान सरकारच्या ध्येय धोरणावर जोरदार टिका केली. यावेळी खालीद पठाण, विजय जयस्वाल, रफीकभाई यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. संचालन दीपक कनोजे यांनी केले तर आभार प्रवीण रुपारेल यांनी मानले.
प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळातच क्षेत्राचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 8:59 PM
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात जेव्हा जेव्हा भाजपाचा खासदार निवडून आला. तेव्हा तेव्हा या भागाचा विकास होण्याऐवजी अधोगती झाली आहे. मागील चार वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्यात एकही मोठा उद्योग आला नसून एकही सिंचन प्रकल्प मार्गी लागला नाही. गोंदिया-भंडारा जिल्हाचा सर्वांगिण विकास केवळ खा.प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात झाला.
ठळक मुद्देराजेंद्र जैन : राष्ट्रवादी काँग्रेस बुथ कमिटी सभेत मार्गदर्शन